अंबानी कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला बिहारमधून अटक

182

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि कुटुंबियांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. रिलायन्स कुटुंबाशी संबधित रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पीटल उडवून देण्याची धमकी आली होती. अनोळखी नंबरवरून हा धमकीचा फोन आला होता. धमकीचा फोन करणाऱ्यास मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. आरोपीवर आयपीएसच्या कलम 506(2),507 अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

(हेही वाचा – “तुमच्या स्क्रिप्टरायटरला क्रिएटिव्हिटी वाढवायला सांगा, कारण…”, फडणवीसांचा ठाकरेंच्या भाषणावर खोचक टोला!)

बिहार दरभंगाचे एसएसपी आकाश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश कुमार मिश्रा असे या तरूणाचे नाव असून तोही मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे दिसून आले आहे. या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई मुंबई पोलीस करणार आहेत. दरम्यान, मुकेश अंबानी आणि कुटुंबाला धमकी देण्याची ही पहिलीच वेळी नाही. यापूर्वी देखील अंबानी कुटुंबाला अनेकदा धमकीचे फोन आले होते. पोलिसांकडून या फोनची चौकशी सुरू आहे.

एका अज्ञात व्यक्तीने रिलायन्स फाऊंडेशनच्या कार्यालयात फोन करुन अंबानी परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली होती. बुधवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास रिलायन्सच्या कार्यालयातील लॅंडलाईनवर अज्ञात नंबरवरुन कॉल आला होता. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी या कॉलच्या माध्यमातून देण्यात आली होती. तसेच मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांनाही जीवे मारण्याची धमकी यावेळी देण्यात आली होती. या प्रकरणाची दखल डीबी मार्ग पोलिसांनी घेतली आणि या प्रकरणाचा तपास सुरु केला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.