वांद्रे-वरळी सी लिंक अपघाताप्रकरणी एकाला अटक

154

मुंबईतील वांद्रे- वरळी सी लिंकवर झालेल्या भीषण अपघाताप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड विधान कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. इरफान अब्दुल रहीम बीलकिया असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर ओव्हर स्पीडिंग आणि रॅश ड्रायव्हिंगचा आरोप आहे.

या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर आठ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

( हेही वाचा: “तुमच्या स्क्रिप्टरायटरला क्रिएटिव्हिटी वाढवायला सांगा, कारण…”, फडणवीसांचा ठाकरेंच्या भाषणावर खोचक टोला! )

काय आहे प्रकरण?

मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर बुधवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास भीषण अपघात झाला. वांद्रेहून वरळीच्या दिशेने जाणा-या मार्गावर पोल नंबर 76 आणि 78 जवळ हा अपघात झाला. भरधाव वेगाने येणा-या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. अपघातात गाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले. अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी काहींची प्रकृती नाजूक असल्याचे कळते.

मृतांची नावे

गजराज सिंह, सत्येंद्र फौजदार, राजेंद्र, चेतन कदम आणि अॅम्ब्युलन्स चालक सोमवाथ साळवे अशी मृतांची नावे आहेत. सत्येंद्र, राजेंद्र, गजराज हे सी लिंकवर सुरक्षारक्षक म्हणून काम करतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.