थायलंडमध्ये एका प्री- स्कूलमध्ये गोळीबार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यात 31 जणांचा मृत्यू झाला आहे. एका माजी पोलीस अधिका-याने प्री-स्कूल चाइल्ड डे-केअर सेंटरमध्ये गोळीबार केला.
थायलंडच्या उत्तर पूर्व भागातील बुआ लाम्फू येथे झालेल्या या घटनेनंतर गोळीबार करणारा फरार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्यांमध्ये मुलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. गोळीबार करणा-याने चाकूनेदेखील हल्ला केल्याचे समजते. हा गोळीबार का करण्यात आला ते अद्याप समजू शकले नाही.
( हेही वाचा: राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना देणार, मुख्यमंत्र्यांचा निर्धार )
हल्लेखोराचा शोध सुरु
राष्ट्रीय पोलीस प्रवक्ता अचयों क्रॅथोंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना नोंग बुआ लाम्फू प्रांतात घडली आहे. या घटनेत किमान 31 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच, हल्ला करणा-या व्यक्तीचा शोध सुरु असल्याचे क्रॅथोंग यांनी सांगितले. सरकारी प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी सर्व तपास यंत्रणांना संबंधित हल्लेखोराचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. थायलंडमध्ये बंदूक बाळगणा-यांचे प्रमाण अन्य देशांपेक्षा अधिक आहे.
Join Our WhatsApp Community