दसऱ्याच्या दिवशी मुंबईत शिवसेनेचे दोन मेळावे झाले, त्यात सर्वाधिक गर्दी कोण खेचणार अशी जोरदार चर्चा सुरु होती. मुख्यमंत्री शिंदे गटाने यासाठी चांगलाच जोर लावला होता. त्याचा परिणाम म्हणून या मेळाव्याला बीकेसीत रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमली. ही गर्दी इतकी होती की शिंदे गटाने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच मागे टाकले.
बीकेसीवर सव्वा लाखांची गर्दी
पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार शिंदे गटाच्या बीकेसी मैदानावरील मेळाव्यात सुमारे 1 लाख 25 हजार लोक जमल्याचे सांगितले. तर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला 65 हजार शिवसैनिक आले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचाही रेकॉर्ड मोडीत काढला. शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे शिंदे गटाने आपला वेगळा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर भरवला होता. या मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते बोलावण्यात आले होते. एमएमआरडीएच्या बीकेसी मैदानाची जागा मोठी आहे. त्यामुळे या मैदानावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा संख्या जास्त असणार अशी शक्यता होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांच्या मेळाव्याला अंदाजे 1 लाख 25 हजार कार्यकर्ते (5 ते 7 हजार कमी किंवा जास्त) जमा झाले होते. याच मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा सभा पार पडली होती. पण, त्यांच्या सभेला जवळपास 97 हजार कार्यकर्ते उपस्थितीत होते.
(हेही वाचा मेळाव्याच्या आधी एकनाथ शिंदेच्या ट्विटवर अमृता फडणवीसांनी काय केले रिट्विट?)
Join Our WhatsApp Community