वारकऱ्यांना घेऊन जाणारी गाडी पलटली, १५ जखमी

148

वारकरी यांना घेऊन जाणारी पिकअप गाडी शिंदवणे घाटात उलटली, या अपघातात १५ वारकरी जखमी झाले असून जखमींना उरुळी कांचन येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. हे वारकरी औरंगाबाद येथील असल्याची माहिती समोर येत आहे. जेजुरी येथील देवदर्शन करून उरुळी कांचनच्या दिशेने निघाले असता शिंदवणे घाटामध्ये तीव्र उतारावर गाडीला ब्रेक न लागल्याने अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास अपघात झाला आहे. या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत तर २० हून अधिक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे.

आळंदी या ठिकाणी देव दर्शनासाठी निघाले होते

मच्छिंद्र माधवराव दाभाडे (वय ६६) शामराव आसाराम देवकाते (वय ६८), भाऊसाहेब उमाजी साबळे (वय-६५ रा. तिघेही धामणगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) अशी गंभीर जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. अपघातात जखमी झालेले नागरिक हे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील आहेत. या पिकअप गाडीतून बुधवारी दिवसभर २४ नागरिक हे देवदर्शनासाठी आले होते. दिवसभर पंढरपूर, जेजुरी येथील देवांचे दर्शन घेऊन पिकअप घेऊन देवाची आळंदी या ठिकाणी देव दर्शनासाठी निघाले होते. शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीतील घाटात आले असता उतारावरील वळणावरती चालकाचे पिकअप वरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. जखमींना उरुळी कांचन येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आली असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. यात एकूण २५ वारकरी असल्याची माहिती समोर येत असून त्यात तिघे गंभीर असल्याचे समजते आहे.

(हेही वाचा दीड वर्षांच्या चिमुकल्या बाळाच्या नावाने राजकारण केलंत?; श्रीकांत शिंदेंचे उद्धव ठाकरेंना पत्र)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.