हिंगोलीत GST च्या पथकाकडून छापेमारी

131

हिंगोली शहरातील फरशी व इतर बांधकाम साहित्य विक्रीच्या दोन दुकानांवर नांदेडच्या वस्तू व सेवाकर विभागाच्या पथकाने 6 ऑक्टोबर रोजी गुरुवारी दुपारी छापे टाकले. या दोन्ही दुकानातील कागदपत्रांची तसेच व्यवहारांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

(हेही वाचा – दीड वर्षांच्या चिमुकल्या बाळाच्या नावाने राजकारण केलंत?; श्रीकांत शिंदेंचे उद्धव ठाकरेंना पत्र)

हिंगोली शहरासह जिल्हाभरातील 3 हजार व्यावसायिकांची नोंदणी आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या वस्तू विक्रेत्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून शासनाला दरवर्षी 8 कोटी रुपयांचा कर भरणा केला जातो. कराच्या भरणा करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये सोयाबीन खरेदी विक्रीचा तसेच फरशी व इतर बांधकाम साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून अधिक प्रमाणात कर भरला जातो. कर भरणा करण्यासोबतच वर्षभरात खरेदी विक्रीतून झालेली उलाढाल, सध्या दुकानात असलेला साठा यासह इतर माहिती ऑनलाईन पध्दतीने कार्यालयाला माहिती सादर केली जाते.

दरम्यान, हिंगोली शहरातील दोन दुकानदारांच्या कागदपत्रांमध्ये कर चुकवेगिरीच्या संशयावरून त्या ठिकाणी छापे टाकून तपासणी करण्याचे आदेश मुंबईच्या वस्तू व सेवा कर विभागाने दिले होते. त्यानुसार नांदेड येथील कार्यालयाच्या पथकाने या फरशी व बांधकाम साहित्य विक्रीच्या दुकानावर छापे टाकले. या छाप्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या पथकाकडून दुकानातील इत्यंभूत माहिती घेतली जात असून यामध्ये दुकानातील साहित्याच्या खरेदी विक्रीतून झालेली उलाढाल, सध्या उपलब्ध असलेला साठा, साहित्याची झालेली खरेदी व खरेदीच्या पावत्या यासह सर्व व्यवहारांची तपासणी केली जात आहे. पुढील दोन दिवस हि माहिती गोळा करण्याचे काम सुरू राहणार असल्याचे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.