शीव रेल्वेवरील पुलाच्या रस्त्यांसाठी २६ कोटींचा खर्च

151

मध्य रेल्वेच्या शीव रेल्वे स्थानकावर आता पुलाचे बांधकाम करण्यात येत असून या पुलाच्या सुमारे १३ कि.मी. लांबीच्या पोहोच रस्त्यांचे काम महापालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे. यामध्ये महापालिकेच्या हद्दीतील काम महापालिका प्रशासन तर रेल्वेच्या हद्दीतील पुलाचे काम हे रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून केले जाणार आहे. त्यामुळे या पुलाच्या पोहोच रस्त्यांच्या बांधकामासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. या बांधकामावर तब्बल २६ हजार कोटींचा खर्च केला जाणार आहे. पुढील १८ महिन्यांमध्ये या पुलाचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित मानले जात आहे.

तांत्रिक सल्लागार नेमण्यात आला

मध्य रेल्वेच्या शीव रेल्वे स्थानकावरील या पुलाची रेल्वेमार्फत पुनर्बांधणी करण्यात येणार होती. परंतु  मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमध्ये हे पूल येत असल्याने पुनर्बांधणीसाठी तसेच पाणी साचत असल्याने या पुलाची उंची वाढवण्याचा  निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार पोहच रस्त्यांचे काम हे महापालिकेच्या माध्यमातून करावे असे रेल्वेने महापालिकेला कळवले होते. त्यामुळे हा पूल मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमध्ये येत असल्याने पुनर्बांधणीसाठी येणारा खर्च हा मध्य रेल्वेमार्फत करण्यात येणार असून पूलाच्या पोहोच रस्त्यांचे काम मुंबई महापालिकेच्या हद्दीत महापालिकेमार्फत करावे अशा प्रकारच्या सूचना रेल्वेकडून प्राप्त झाल्याने या बांधकामाकरता पुलाचा आराखडा, नियोजन आणि संकल्पचित्रे बनवण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून तांत्रिक सल्लागार नेमण्यात आला.

(हेही वाचा एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टाकले मागे)

पुढील १८ महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होईल

त्यानुसार महापालिकेने मागवलेल्या निविदांमध्ये सहा कंत्राटदार कंपन्यांनी भाग घेतला होता. त्यामध्ये निरज सिमेंट स्ट्रक्चरल लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली असून या कंपनी अंदाजित दरापेक्षा सुमारे १९ टक्के कमी बोली लावून हे काम मिळवले आहे. त्यामुळे या पुलाच्या पोहोच मार्गाच्या बांधकामासाठी निरज सिमेंट स्ट्रक्चरल कंपनीची निवड करण्यात आली आहे. या  कंपनीला विविध करांसह सुमारे २६ हजार कोटींमध्ये हे काम बहाल करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच या कामाला सुरुवात होणार असून पुढील १८ महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होईल असा विश्वास पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.