बाॅलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे शुक्रवारी 7 ऑक्टोबरला निधन झाले. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांनी आपल्या करिअरची सुरुवात 90 च्या दशकात केली होती. त्यांनी राजू बन गया जेंटलमन, फूल और अंगारे, खलनायक, 3 इडियट्स आणि पानिपतसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सहाय्यक भूमिका साकारत प्रेक्षकांकडून वाहवा मिळवली होती.
अभिनेते अरुण बाली यांनी वयाच्या 79 व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. मिडिया रिपोर्टनुसार, अरुण बाली यांनी पहाटे साडेचार वाजता अखेरचा श्वास घेतला. अनेक दिग्गज कलाकारांसोबतही त्यांनी काम केले होते.
( हेही वाचा: दीड वर्षाच्या मुलाला राजकारणात ओढून काय साध्य केलंत उद्धव ठाकरे? )
काही दिवसांपासून होते आजारी
बाॅलिवूड लाईफच्या माहितीनुसार, ते मागच्या काही काळापासून आजारी होते. काही महिन्यांपूर्वी जेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेव्हा त्यांच्या मुलीने माध्यमांना त्यांच्या तब्येतीची माहिती दिली. तेव्हा बाली हे मायस्थेनिया ग्रेविस नावाच्या ऑटोइम्यून या आजाराने ग्रस्त असल्याचे समजले. त्यांना त्यानंतर काहीवेळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज त्यांचा मृत्यू झाला.