NTSE Scheme देशभरात घेतली जाणारी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. NCERT ने एक नोटिफिकेशन काढले आहे. शिवाय NCERT च्या संकेतस्थळावर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना अधिकाधिक विद्यार्जनासाठी प्रोत्साहित करणे हे योजनेचे उद्धिष्ट असते. ही योजना पुढे चालू ठेवण्यास केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नव्याने मंजुरी दिलेली नाही.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा देशपातळीवर घेण्यात येते. या परीक्षेसाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद ही संस्था समन्वयक म्हणून काम करते.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची परीक्षा
दहावीच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. ती उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना अकरावी ते पीएचडीपर्यंतच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी प्रत्येक राज्याला या शिष्यवृत्ती योजनेसाठी कोटा ठरवून दिला जातो.
योजना रद्द केल्याची माहिती वेबसाईटवर
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा योजनेच्या स्थगितीची माहिती NCERT च्या वेबसाईटवर देण्यात आली. या योजनेसाठी 31 मार्च 2021 पर्यंतची मान्यता देण्यात आली होती. मात्र केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून ही शिष्यवृत्ती योजना पुढे चालवण्यासाठी नव्याने परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत ही शिष्यवृत्ती योजना स्थगित करण्यात येत असल्याचे त्यात नमूद केले आहे.
Join Our WhatsApp Community