‘आदिपुरुष’ चित्रपटाला मनसेचा पाठिंबा; नुसत्या टीझरवरुन मुल्यमापन न करण्याचे आवाहन

157

भाजपच्या नेत्यांकडून आदिपुरुष या चित्रपटाला विरोध होत असतानाच, आता मनसेने मात्र या चित्रपटाला समर्थन दिले आहे. मनसे नेते आणि चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी यासंदर्भात एक पत्र जाहीर केले आहे. ओम राऊत यांच्याकडून अभ्यासपूर्ण मांडणी केल्याचा दावा अमेय खोपकर यांनी केला आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमेय खोपकर यांनी आदिपुरुष सिनेमाच्या टीमला आणि ओम राऊत यांना पाठिंबा दिला आहे. लोकमान्य आणि तान्हाजी सारखे सिनेमे ओमने बनवले आहेत. ओम राऊत हा हिंदुत्ववादी माणूस आहे. राज्यातल्या सिनेमा समजणा-या हिंदुत्ववादी नेत्यांना माझा प्रश्न आहे, 95 सेकंदाच्या टीझरवरुन सिनेमा कसा असेल याचा अंदाज तुम्ही कसा बांधता? आधी सिनेमा पाहा.

( हेही वाचा: NCB ची मोठी कारवाई: मुंबईतल्या गोडाऊनमधून 100 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त )

अमेय खोपकर यांचे ट्वीट 

अमेय खोपकर यांनी ट्वीट करत, ओम राऊत या दिग्दर्शकाने यापूर्वी लोकमान्य आणि तान्हाजी सारख्या कलाकृतींमधून इतिहासाची अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ओम राऊत यांनी साकारलेला भव्य लाईट अॅंड साऊंड शो आजही दिमाखात सुरु आहे.

तसेच, ओम राऊत यांच्या आगामी आदिपुरुष टीझरवरुन टीका होणे हे दुर्दैवी आहे. ओम राऊत आणि सहका-यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची प्रचीती चित्रपट प्रदर्शित झाल्यावर येईल अशी आम्हाला खात्री आहे. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आदिपुरुष या चित्रपटाला पू्र्ण पाठिंबा आहे, असे अमेय  खोपकर म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.