गाडीच्या चाकांमधील घर्षणामुळे धावत्या सिद्धेश्वर एक्सप्रेसला आग

150

सोलापूरहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या सिद्धेश्वर एक्सप्रेस या गाडीच्या चाकांमधील घर्षणामुळे आग लागल्याची घटना आज (शुक्रवार) पहाटे पाच वाजून 40 मिनिटाला खंडाळा ते कर्जत रेल्वे स्थानका दरम्यान घडली. गाडीतील कर्तव्यावर असलेल्या टीसी व आरपीएफ जवानाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 12116 सिद्धेश्वर एक्सप्रेस  7 सप्टेंबर शुक्रवार रोजी सोलापूरहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या गाडीच्या चाकामध्ये प्रचंड घर्षण होऊन आग निर्माण झाली. ही घटना खंडाळा ते कर्जत रेल्वे स्थानक दरम्यान धावत्या गाडीमधील S2 व S3 कोचमध्ये घडली. दोन डब्यांना जोडल्या गेलेल्या गॅप मधून अचानक धुराचे लोट डब्यामध्ये पसरताच. गाडीला आग लागली म्हणून प्रवाशांमध्ये एकच धावपळ सुरू झाली. गाडीमध्ये आग लागल्याची माहिती आरपीएफ जवान व टीसी याांना मिळताच सिद्धेश्वर एक्सप्रेस कर्जत रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली. लागलीच S2 व S3 मधील सर्व प्रवाशांना आग आटोक्यात येईपर्यंत इतर डब्यात हलवण्यात आले. गाडीतील आरपीएफ जवान व टीसी यांनी तत्काळ अग्निरोधक यंत्राचा वापर सुरू केला. जवळपास सात ते आठ कार्बन डाय-ऑक्साइड सिलेंडरचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवले.

( हेही वाचा: दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी ईडीची 35 ठिकाणी छापेमारी )

कोणतीही जीवित हानी नाही

आग विझवण्यासाठी 25 ते 30 मिनिटे गाडी कर्जत स्थानकावर थांबवण्यात आली. घटनेची माहिती पुणे विभागातील कंट्रोल रूमला मिळताच वरिष्ठ अधिकारी व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले. गाडीची पाहणी करून गााडी पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.