उत्तर प्रदेशमधून लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. एका मुस्लिम तरुणाने आपण अमित असल्याचे सांगत एका हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तसेच, तिच्यावर बलात्कार करुन तिला निकाह करण्यास भाग पाडल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरिफ उर्फ तनवीर मीर्झा असे आरोपीचे नाव आहे. आरिफ हा बाईकवर भगवे झेंडे लावून हिंदू मुलींना फसववायचा, असा आरोपही त्याच्यावर करण्यात आला आहे.
नाहरघाटी, मियांगढ येथील रहिवासी आरिफ उर्फ तनवीर मिर्झा याने अमित असल्याचे भासवून एका हिंदू मुलीला नोकरी लावण्याच्या बहाण्याने हाॅटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, आरिफचे कुटुंबीय तिच्यावर धर्म परिवर्तन करुन लग्न करण्यासाठी दबाव टाकत होते. त्यानुसार तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी 2 ऑक्टोबर रोजी आरिफ उर्फ तनवीरविरुद्ध गुन्हा दाखल केला.
( हेही वाचा: समृद्धी महामार्गासाठी वेगमर्यादा 120 किमी; तर ‘या’ वाहनांना महामार्गावर परवानगी नाही )
आक्षेपार्ह व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल केले
आरिफ हिंदू मुलींना फसवण्यासाठी बाईकवर भगवे झेंडे लावून फिरत असे. तसेच आरिफ उर्फ तनवीर मीर्झा याने मुलीवर केवळ बलात्कारच केला नाही तर तिचा आक्षेपार्ह व्हिडओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेलही करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने सांगितल्याप्रमाणे, आरिफने तिला रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवले होते. त्यानंतर त्याने रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी हाॅटेलमध्ये राहत असल्याचे सांगून तिला हाॅटेलमध्ये बोलावले. पीडितेने आरोप केला आहे की, आरिफने तिच्यावर बलात्कार केला आणि तिचा व्हिडिओही बनवला. तसेच, आरिफच्या कुटुंबातील सदस्य नूर आलम, शाहनवाज आणि मेहुणी बेबी यांनी तिला धर्मांतर करण्यास भाग पाडले. सध्या पोलिसांनी या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास सुरु आहे.