हिंदू महासभेचे ज्येष्ठ नेते माधवराव नगरकर यांचे गुरुवारी, २२ सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अर्थात शिवाजी पार्क येथील हिंदू स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. नगरकर यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदुमहासभेच्या वतीने माधवराव नगरकर यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन रविवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२२ या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता पाटील मारुती मंदिर सभागृह, न. चिं. केळकर मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई येथे करण्यात आले आहे. देशभक्त नागरिकांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदुमहासभेच्या वतीने करण्यात आले आहे.
(हेही वाचा “धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटालाच मिळणार”; शंभुराज देसाईंचा दावा)
कै. नगरकर यांनी वीर सावरकरांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी ‘हिंदू मित्र मंडळा’ची स्थापना केली. त्या मंडळाच्यावतीने थोर पुरुषांच्या स्मृती प्रित्यर्थ व्याख्यानांचे आयोजन त्यांनी केले, सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या नगरकरांचा मसुराश्रमातील दिवगंत ब्रह्मचारी विश्वनाथजी यांच्याशी निकटचा स्नेह होता. वीर सावरकराच्या हिंदुत्वाचा प्रचार त्यांनी सातत्याने हिंदू महासभेच्या व्यासपीठावरून केला. हिंदू महासभेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ते कृतिशील होते. महाराष्ट्र प्रदेशचे प्रमुख कार्यवाह पद त्यांनी भुषविले होते. हिंदू महासभेचे भूतपूर्व नेते कै. विक्रमराव सावरकर, कै. गोपाळराव गोडसे आणि कै. माधवराव पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हिंदू महासभेत कार्य केले.
Join Our WhatsApp Community