नारायण राणेंनी आरोप केलेला ‘तो’ चतुर्वेदी गेला कुठे?

192
उद्धव ठाकरेंनी सामनामधून काळा पैसा पांढरा केला, त्यासाठी चतुर्वेदी नावाच्या ‘सीए’ची मदत घेतली. हा चतुर्वेदी छगन भुजबळ यांचाही सीए होता, असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी केला. मात्र, हा चतुर्वेदी गेल्या काही दिवसांपासून गायब असून, केंद्रीय यंत्रणांकडून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
२०२०-२१ आणि २०२१-२२ या आर्थिक वर्षांत कोरोनामुळे देशभरात उद्योगधंदे बंद पडलेले असताना शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ने ४२ कोटी रुपयांची उलाढाल केली आणि साडे अकरा कोटी रुपयांचा नफा कमावला. देशातील सर्व मुद्रित आणि दृक्श्राव्य माध्यमांना प्रचंड तोटा सहन करावा लागत असताना, कोरोना काळात एकट्या सामनाने नफा कमावला. यामागचे गुपीत काय, असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी भुजबळ दोन-अडीच वर्ष तुरुंगात राहिले. त्याच भुजबळांच्या सीएने उद्धव ठाकरेंचा काळा पैसा पांढरा करून दिला. भुजबळांनी अडीच वर्षे तुरुंगात काढली, आता उर्वरित अडीच वर्षे उद्धव ठाकरेंना तुरुंगात काढायची आहेत, असा घणाघात नारायण राणे यांनी केला.
राणे महिन्याभरापासून मागावर
दरम्यान, नारायण राणे यांच्या आरोपानंतर हा चतुर्वेदी कोण, याबाबतच्या चर्चा सर्वत्र सुरू झाल्या. ‘हिंदुस्थान पोस्ट’ने याचा मागोवा घेतला असता, तो गेल्या काही दिवसांपासून गायब असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नारायण राणे महिनाभरापासून या प्रकरणातील कागदपत्रे जमा करत होते, त्याची कूणकूण लागताच चतुर्वेदी गायब झाल्याचे कळते. नारायण राणे यांनी यासंदर्भातील सगळी कागदपत्रे आयकर विभागाला दिली असून, केंद्रीय यंत्रणांकडून चतुर्वेदीचा शोध सुरू झाल्याचे समजते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.