जखमी झालेला गोविंदा प्रथमेश सावंतचा उपचारादरम्यान मृत्यू

150

जखमी झालेला गोविंदा प्रथमेश सावंत याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. दहीहंडीच्या मनो-यावरुन कोसळून प्रथमेश सावंत हा गोविंदा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु असताना, ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

मागच्या एक महिन्याच्या अधिक काळापासून प्रथमेश सावंत या गोविंदावर उपचार सुरु होते. प्रथमेश हा करीरोडला वास्तव्यास होता. दहीहंडीच्या वरच्या मनो-यावरुन कोसळून त्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु होते. हे उपचार सुरु असतानाच त्याला न्यूमोनिया झाला आणि या न्यूमोनियावर उपचार सुरु असताना त्याला ह्रदयविकाराचा झटका आला आणि शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती केईएम रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. गंभीररित्या जखमी झालेला गोविंदा प्रथमेश सावंत बरा व्हावा, यासाठी अनेक संस्था मदत करत होत्या. तसेच, मुख्यमंत्र्यांनीदेखील प्रथमेशला उपचारासाठी मदत केली होती. मात्र, प्रथमेशची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.

( हेही वाचा: नाशिक बस दुर्घटनेवर पंतप्रधानांनी व्यक्त केली हळहळ; मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख, तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.