JIO आणि AIRTEL या दोन्ही कंपन्यांनी आपल्या 5G सेवेची घोषणा केली आहे. मात्र, 5G सेवा सध्या पॅन इंडिया स्तरावर उपलब्ध नाही. त्यासाठी पुढील वर्षांपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
जिओने सुरुवातीला चार शहरांमध्ये आपली सेवा सुरु केली आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसी या शहरांचा समावेश आहे. या शहरांमध्ये ग्राहकांना जिओ 5G चा अनुभव मिळत आहे. कंपनी आपली 5G सेवा वापरण्यासाठी वेलकम ऑफरदेखील देत आहे.
या अंतर्गत युजर्सना 1GBps च्या स्पीडने अनलिमिटेड डेटा मिळत आहे. जिओ निवडक युजर्सना 5G सेवेचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रणे पाठवत आहे. तुम्हाला हे आमंत्रण My Jio अॅपवर मिळेल. यासाठी तुम्हाला My Jio अॅपवर जावे लागेल आणि तुम्हाला आमंत्रण आले की नाही, हे नोटिफिकेशमध्ये तपासावे लागेल.
( हेही वाचा: भविष्यात आर्थिक चणचण भासू नये म्हणून ‘या’ 5 गोष्टी आताच करा )
तसे, तुम्हाला My Jio अॅपवर त्याचे आमंत्रण होमपेजवरच दिसेल. कंपनीने या आमंत्रणावर एक अटही ठेवली आहे. ज्याची माहिती ऑफरमध्ये देण्यात आलेली नाही. जिओ 5G सेवेचा अनुभव फक्त अशा ग्राहकांचा मिळेल, ज्यांनी किमान 239 रुपयांचा रिचार्ज केला आहे. म्हणजेच वेलकम ऑफरचा लाभ फक्त अशा ग्राहकांना मिळेल, ज्यांच्या फोनवर 239 रुपये किंवा त्याहून अधिक रिचार्ज असेल.
कंपनीने सांगितल्याप्रमाणे, पोस्टपेड आणि प्रीपेड दोन्ही ग्राहकांना जिओ 5G चा लाभ मिळेल, जर त्यांनी रुपये 239 किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्ज केले असेल. टेलिकाॅम रिपोर्टनुसार, जर तुमच्या फोनमध्ये यापेक्षा कमी रिचार्ज असेल तर तुम्ही जिओ वापरु शकणार नाही. या ब्रॅंड्सवर उपलब्ध असलेली सेवा जिओने दस-याच्या मुहूर्तावर चार शहरांमध्ये सुरु केली आहे.
Join Our WhatsApp Community