नाशिकला पुन्हा बस जळाली, सुदैवाने जीवित हानी नाही

191
रविवार हा महाराष्ट्रासाठी अपघात वार ठरला आहे. पहाटेच्या वेळी नाशिक येथील नंदुरनाका येथे एका खासगी बस आणि डंपरची जोरदार धडक झाली, त्यात बसने पेट घेतला आणि १३ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर काही तासांतच नाशिकमध्ये आणखी एक बस जळाली, ही बस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने पेट घेतली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

बस वणी गडावर जात होती

वणी येथे पुन्हा द बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला. सप्तशृंगी गडाकडे जाणा-या बसने पेट घेतला. काही कळण्याच्या आतच बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने या बसमधील सर्व प्रवासी भाविक सुखरूप असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. नाशिकच्या वणी गडावर जाणाऱ्या या चालत्या बसने अचानक पेट घेतला. प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बसला अचानक आग लागल्याने खळबळ माजली. प्रसंगावधान राखत प्रवाशी खाली उतरले. त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. नांदुरीहून वनी गडावर ही बस जात होती. बसला आग लागल्याचे कळताच स्थानिक तरुणांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दुपारी बारा वाजेच्या दरम्यान श्री सप्तशृंग गड येथे ग्रामपंचायतच्या टोलनाक्याच्या जवळ महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. एसटी बस पिंपळगाव बसवंत डेपोची होती. प्रसंगावधान राखून चालक आणि वाहक यांनी सर्व प्रवाशांना खाली उतरवले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.