रविवार, ८ ऑक्टोबर हा वार नाशिकची अक्षरशः घातवार ठरत आहे. नाशिकमध्ये पहाटे औरंगाबादरोडवर असलेल्या मिरची हॉटेलजवळ खासगी बसला आग लागून बारा जणांचा मृत्यू झाला, यानंतर सप्तशृंगी गडावर एसटी महामंडळाच्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. त्यानंतर आता गॅस सिलिंडर घेऊन जाणारा बुलेट ट्रक उलटून भीषण आग लागल्याची घटना मनमाडनजीक घडली आहे.
आग विझवणे बनले कठीण
पुणे -इंदूर महामार्गांवर झालेल्या या अपघातात सिलिंडर्स रॉकेटसारखे हवेत उडत होते. सिलिंडरचे स्फोट होत असल्याने या मार्गावरील वाहतूक दूर अंतरापासून रोखून ठेवण्यात आली होती. त्यामुळे पुणे-इंदूर महारमार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. मनमाड पासून जवळ पुणे -इंदौर महामार्गांवर गॅस सिलिंडर घेऊन जाणारा बुलेट ट्रक पलटी होऊन त्यात आग लागल्याची घटना घडली. दरम्यान ट्रकला आग लागल्यानंतर सिलिंडरचे स्फ़ोट होत असल्यामुळे आगीची तीव्रता वाढली. तसेच वेळीच घटना लक्षात आल्यामुळे या मार्गांवरील वाहतूक 2 किमी लांब रोखून धरण्यात आली आहे. ट्रकमध्ये गॅसने भरलेले सुमारे 200 सिलिंडर असल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले मात्र सिलिंडरचे स्फ़ोट होत असल्यामुळे तेथे जाण्यास अडचण येत आहे. अपघातात चालक जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ट्रकमध्ये हायड्रोजन सिलिंडर होते. ट्रकचा टायर फुटल्याने ट्रक रस्त्याचे बाजूने असलेल्या नाल्यात उलटला. त्यात आग लागून सिलिंडरचा स्फोट झाला.
(हेही वाचा राहुल गांधींनी पुन्हा ओकली गरळ, वीर सावरकरांचा अवमान, उद्धव ठाकरे निषेध करणार का, फडणवीसांचा सवाल!)
Join Our WhatsApp Community