गेल्या काही दिवसांपासून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर अभ्यागतांची संख्या वाढू लागली आहे. मुख्यमंत्र्यांची भेट मिळाल्याशिवाय मंत्रालय सोडणार नाही, असाही हट्ट अलिकडे काहीजण करू लागले आहेत. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या सर्वसामान्य नागरिकांच्या हट्टाखातर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुक्रवारी ७ ऑक्टोबरला मंत्रालयात ‘ओव्हरटाइम’ करावा लागला. विशेष म्हणजे या दिवशी शिंदे-फडणवीस सरकारला १०० दिवस पूर्ण झाले.
रात्री नऊच्या सुमारास मुख्यमंत्री मंत्रालयातून बाहेर पडले
शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे मंत्रालयात आगमन झाले. त्यानंतर त्यांनी नियोजित परिवहन विभाग, मीरा भाईंदर महापालिका विकास कामांचा आढावा, कोळी बांधवांच्या समस्यांबाबत बैठका घेतल्या. त्यानंतर विलेपार्ले येथे नियोजित कार्यक्रम होता. त्यासाठी मंत्रालयाबाहेर पडण्यापूर्वी त्यांनी अभ्यागतांच्या भेटी घेतल्या. तोपर्यंत सायंकाळचे पावणे आठ वाजले होते. आपल्याला भेटायला समिती कक्षाबाहेर किमान दीडशे ते दोनशे नागरिक उपस्थित असल्याचे त्यांना कळले. नियोजित कार्यक्रम असला तरी सामान्यांना न भेटताच कसे जायचे, म्हणून त्यांनी सगळ्यांना भेटायचे ठरवले. त्यानंतर सहाव्या मजल्यावरील समिती कक्षात मुख्यमंत्री आले. त्यांनी प्रत्येकाची भेट घेतली, निवेदने स्वीकारली. त्यावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी सूचनाही लिहिल्या. मुख्यमंत्री एवढ्या उशिराही भेटताहेत हे पाहून त्यांना भेटून बाहेर पडणाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते. रात्री नऊच्या सुमारास मुख्यमंत्री मंत्रालयातून नियोजित कार्यक्रमाला रवाना झाले.
(हेही वाचा राहुल गांधींनी पुन्हा ओकली गरळ, वीर सावरकरांचा अवमान, उद्धव ठाकरे निषेध करणार का, फडणवीसांचा सवाल!)
Join Our WhatsApp Community