शिंदे गट आणि ठाकरे गटातील लढाईत दोन्ही गटाला मोठा झटका बसला. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण निवडणूक आयोगाने गोठवले. त्यामुळे शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना आता हे चिन्ह वापरता येणार नाही. तसेच शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत दोन्ही गटांना आयोगाला पर्याय द्यायचे आहेत. यात आता ठाकरे गटाने आपले चिन्ह ठरवल्याचे सुतोवाच ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दिले आहेत. नार्वेकर यांनी वाघाचा फोटो ट्वीट करत, आमचे चिन्ह श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटले आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे हे नवे चिन्ह असल्याचे बोलले जात आहे.
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) October 8, 2022
( हेही वाचा: राहुल गांधींनी पुन्हा ओकली गरळ, वीर सावरकरांचा अवमान, उद्धव ठाकरे निषेध करणार का, फडणवीसांचा सवाल! )
नार्वेकरांचे सूचक ट्वीट
ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी एक सूचक ट्वीट केले आहे. आयोगाने धनुष्यबाण गोठवल्यानंतर, नार्वेकरांकडून वाघाचा फोटो ट्वीट करण्यात आला आहे. आमचे चिन्ह उद्धव ठाकरे असे कॅप्शन देण्यात आले आहे. त्यामुळे नार्वेकरांच्या कॅप्शनचीदेखील सध्या चर्चा होत आहे. आमचे चिन्ह उद्धव ठाकरे आहेत आणि ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे मिलिंद नार्वेकरांना या ट्वीटमधून सुचवायचे असेल.
Join Our WhatsApp Community