Nashik bus Accident: नाशिक बस दुर्घटनेतील ट्रक चालकाला अटक

121

नाशिक शहरातील औरंगाबाद रोडवरील मिरची हाॅटेलजवळ शनिवारी एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात लक्झरी बसने पेट घेतल्याने त्यामध्ये होरपळून 12 जणांचा मृत्यू झाला. आता या अपघाताप्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ट्रक चालकाला शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली .

शनिवारी सकाळी नाशिकमधील मिरची हाॅटेल चौफुलीवर ट्रक आणि चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसचा पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. ट्रक आणि बसची टक्कर झाल्याने बसने पेट घेतला आणि ही दुर्दैवी घटना घडली. अपघातानंतर बसने पेट घेतल्याने बसचा कोळसा झाला. मात्र या घटनेत 12 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला.

( हेही वाचा: ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून बनावट स्टॅम्पचा वापर; 4 हजार 682 खोटी प्रतिज्ञापत्रे जप्त )

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी ट्रकचालक रामजी यादव, बसचालक ब्रम्हनाथ सोयाजी मनोहर पोहराजेवी वाशी, यांच्यासह दीपक शेंड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकणातील ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे. आडगाव पोलिसांनी रात्री उशिरा ही कारवाई केली आहे. रामजी यादव असे या ट्रक चालकाचे नाव आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.