एसटी कर्मचारी वेतनच्या प्रतीक्षेत

161

MSRTC एसटीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांचे वेतन दर महिन्याच्या 7 तारखेला दिले जाते. चालक वाहक आणि यांत्रिकी कर्मचारी यांनी वेतन मिळाले आहे. मात्र, एसटीच्या प्रशासकीय कर्मचारी व अधिका-यांना वेतनाची प्रतीक्षा आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत वेतन मिळाले नव्हते. यामुळे वेतन सोमवार वा मंगळवारी मिळण्याची शक्यता आहे.

एसटी महामंडळ आधी आर्थिक अडचणीत असताना, कोरोनामध्ये मोठे नुकसान सोसावे लागले. त्यामुळे सरकारने मदत केल्यानंतरच कर्मचा-यांचे वेतन देण्यात येते. कोरोनापूर्व काळात दररोज एसटीचे 65 लाख प्रवासी आणि 22 कोटींचे उत्पन्न होते. मात्र, कोरोना आणि संप यामुळे एसटीचा मोठा प्रवासीवर्ग दुरावला आहे. सद्यस्थितीमध्ये दररोज 28 कोटी रुपये उत्पन्नाची आवश्यकता असताना 13 कोटींचे उत्पन्न मिळत आहे, तर प्रवासी संख्याही 30 लाखांवर आली आहे. प्रशासकीय कर्मचारी व अधिका-यांना वेतन देण्यासाठी 25 कोटींचा निधी नसल्याने वेतन रखडल्याचे समजते आहे.

( हेही वाचा: ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून बनावट स्टॅम्पचा वापर; 4 हजार 682 खोटी प्रतिज्ञापत्रे जप्त )

117 कर्मचा-यांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय चांगला आहे. पण महामंडळाला एका पैशाचीही मदत जाहीर झालेली नाही. दिवाळी भेट, महागाई भत्ता तत्काळ मिळणे गरजेचे असताना, त्यावर काहीही निर्णय झाला नाही. प्रशासकीय कर्मचारी व अधिकारी यांना वेळेवर वेतन न देणे हे निंदनीय आहे.- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काॅंग्रेस.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.