काश्मीर प्रकरणी मध्यस्थाची गरज नाही; भारताने पाकिस्तान आणि जर्मनीला सुनावले

123

काश्मीर मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी तिस-या पक्षाची, मध्यस्थाची आवश्यकता नसल्याचे भारताने ठणकावून सांगितले आहे. काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्राने पुढाकार घ्यावा, असे वक्तव्य पाकिस्तान आणि जर्मनीने केले होते. आता भारताने त्यावर आक्षेप घेत, पाकिस्तानसह जर्मनीलाही सुनावले. जम्मू काश्मिरमध्ये दहशतवाही कारवाया करणा-या पाकिस्तानमधील दहशतवाद्यांवर कारवाई करणे अधिक गरजेचे असल्याचेही भारताने म्हटले आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी आणि जर्मनीचे परराष्ट्र मंत्री अॅनालेना बॅरबाॅक यांनी बर्लिनमध्ये शुक्रवारी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले होते. त्यावेळी दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांनी काश्मीर मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्राने भूमिका बजवावी असे म्हटले होते.

( हेही वाचा: ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून बनावट स्टॅम्पचा वापर; 4 हजार 682 खोटी प्रतिज्ञापत्रे जप्त )

…तर तुम्ही पीडितांवर अन्याय करता आहात 

भारताने पाकिस्तान आणि जर्मनीच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील या भूमिकेवर आक्षेप घेतला. काश्मीर हा पाकिस्तानसोबतचा द्विपक्षीय मुद्दा असून, तिस-या देशाला अथवा तिस-या पक्षाला हस्तक्षेप करण्याची काहीही आवश्यकता नसल्याचेही भारताने म्हटले आहे. भारताचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू- काश्मिर राज्यात मागील अनेक दशकांपासून दहशतवाद सुरु असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तसेच, लष्कर-ए-तोयबाने केलेल्या मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत बागची यांनी म्हटले की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि FATF अजूनही या हल्ल्यातील सूत्रधारांचा शोध घेत आहेत. एखादा देश याचे गांभीर्य समजत नसेल, स्वार्थापोटी उदासीन असेल तर दहशतवादी हल्ल्यातील पीडितांवरही अन्याय करत असल्याचे भारताने म्हटले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.