शिवसेनेतील प्रबळ नेते एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसमवेत उठाव केला आणि शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट हे दोन गट निर्माण झाले. या दोन्ही गटांनी मिळून धनुष्यबाण आणि शिवसेनेवर दावा केला. या दाव्यानंतर आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं तसेच दोन्ही पक्षांना शिवसेना नाव वापरण्यालाही मज्जाव केला. त्यानंतर आयोगाने दुसरे नाव घेण्यास सांगितले त्यावर आता दोन्ही गट शिवसेना बाळासाहेब ठाकरे या एकाच नावावर दावा करत आहेत. त्यामुळे आता नवा पेच निर्माण झाला आहे.
( हेही वाचा: …म्हणून तुमच्याकडे चिन्हही नाही आणि पक्षाचे नावही नाही; केसरकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल )
आता नावही गोठणार ?
निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशात दोन्ही गटांना शिवसेना हे नाव वापरता येणार नाही. मात्र, शिवसेना या नावाच्या पुढे उपनाम जोडता येणार आहे. त्यानुसार शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाने आता आपल्या गटासाठी एकच नाव सुचवले आहे. दोन्ही गटांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावाची मागणी केली आहे. आता, दोन्ही गटाने मागणी केल्याने निवडणूक आयोगाकडून हे नावदेखील गोठवण्यात येण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community