निवडणूक आयोगाकडून ‘धनुष्यबाण’ हेच चिन्ह मिळवणार, केसरकर म्हणाले…

145

शिवसेना आणि शिंदे गटात सुरू असलेल्या वादातून शनिवारी निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात गोठवण्याचा निर्णय घेतला. तसेच दोघांनाही शिवसेना हे नाव न वापरण्याचे निर्देश आयोगाने दिले आहे. यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी या घडलेल्या घटनेला उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. ठाकरे गटाने खूप वेळ मागून घेतला होता. आम्ही आमच्या मतावर ठाम आहोत, आम्ही निवडणूक आयोगाकडे आमचं धनुष्यबाण हे चिन्ह मागणार आहोत आणि आम्ही हेच चिन्ह मिळवणार असल्याचे केसकरांनी सांगितले.

पुढे केसरकर असेही म्हणाले की, आमच्याकडे जास्त लोक आहेत. चिन्ह गोठावल्याचे दुःख त्यांच्यापेक्षा जास्त आम्हाला आहे. जर त्यांना वाईट वाटत होतं तर त्यांनी नवीन चिन्ह आणि नावं का दिली.. आम्ही आजही आमच्या चिन्हांवर आणि पक्षावर ठाम आहोत. त्यामुळे आम्ही आयोगाकडून आमचं चिन्ह मागणार आहोत, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे.

(हेही वाचा- शिवसेनेचे चिन्ह गोठवल्याने मनसेला दुःख, काय म्हणतात मनसे नेते?)

निवडणूक आयोगाने असा निर्णय पहिल्यांदाच घेतला असे नाही, यापूर्वी देखील तामिळनाडूमध्ये जयललिता आणि पन्नीरसेल्वम यांच्या बाबतीत घेतला होता. आमचं बाळासाहेबांवर प्रेम आहे त्यामुळे त्यांनी ठरवलेल्या चिन्हावर ही आमचं प्रेम आहे. त्या चिन्हांसाठी आम्ही लढणार आहोत. धनुष्यबाण हे शिंदे गटाचं आहे. ते चिन्हं गोठवल्याचा जास्त त्रास आम्हाला होत आहे. धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाचं आहे आणि आम्ही त्यासाठी आयोगाकडे बाजू मांडणार आहोत, असेही केसरकरांनी म्हटले आहे.

ठाकरे गट सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हाला बाळासाहेबांचे विचार जपायचे आहेत. त्यांच्या विचारांचे आम्ही आहोत आणि आम्ही तेच चिन्ह मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. आम्ही कोणतेही पर्याय दिलेले नाहीत. चिन्ह, बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. आमचा लढा विचारांचा आहे, हिंदुत्वाचा आहे, असेही ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.