हलाल भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान – डॉ. सच्चिदानंद शेवडे

151

१२, १३ नोव्हेंबर रोजी मुंबईत हलालच्या प्रचारासाठी मुसलमान हलाल शो करणार आहे. आपल्यासारख्या लोकशाहीवादी देशामध्ये अशा प्रकारचे कृत्य एखाद्या धर्माच्या नावाखाली का आणि कसे काय केले जाऊ शकते याचे आश्चर्य वाटते. एकीकडे धर्मनिरपेक्ष म्हणायचे आणि दुसरीकडे एखाद्या धर्माच्याच नावाचे एखादा जो भाग आहे, तोच लोकांना खायला, प्यायला आणि लिहायला लावण्यामागची काय मानसिकता आहे, हेच कळत नाही. एखाद्या कंपनीला सरकार जर प्रमाणपत्र देत असेल, तर सरकारच्या प्रमाणपत्राच्या व्यतिरिक्त इतर कुणाच्या तरी प्रमाणपत्राची आवश्यकता काय आहे? अशा प्रकारचे प्रमाणपत्र कोणत्या तरी संस्थेच्या नावाने देणे, हा सगळा भाग सरकारला तरी मान्य आहे का? देशाच्या सार्वभौमत्वाला हे आव्हान नाही का?, असा प्रश्न राष्ट्रीय प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे म्हणाले.

हे आव्हानसुद्धा राज्यकर्त्यांना मान्य आहे का? असे करणाऱ्यांनी स्वतःचे एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज निर्माण केले आहे का? कारण हलाल प्रमाणपत्र देण्यासाठी अशा काही आस्थापनांना दोन-दोन मुस्लिम प्रतिनिधी ठेवायला लागणार आहे. त्यांचा पगारही त्याच आस्थापनाने द्यायचा आहे. हे दोन-दोन मुस्लिम प्रतिनिधी कोण असणार आहेत? कुठे कुठे त्यांची नेमणूक होणार आहे? त्यांची अहर्ता काय असणार आहे? याचा अर्थ नेमका काय? हे सगळे कळत नाही. खरेतर सरकारच्या गुप्तचर यंत्रणांनी या सगळ्याची शहनिशा करायला पाहिजे. तोपर्यंत किमान आमच्यासारख्यांना हलाल सर्टिफिकेट असलेले प्रमाणपत्र खायला, प्यायला, लिहायला असू नये, असेही डॉ. सच्चिदानंद शेवडे म्हणाले.

(हेही वाचा ‘हलाल’च्‍या सक्‍तीला ‘झटका’ देण्‍यासाठी हिंदूंची एकजूट हवीच!)

इस्लामी कट्टरतावादाचे षडयंत्र! – दुर्गेश परुळकर

प्रत्येक राष्ट्राने आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे, हे नैसर्गिक आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या सबळ होण्याचा अधिकार आहे. तथापि त्याचा गैरवापर करून संपूर्ण मानवजातीला उपद्रव देण्याचा अधिकार कुणालाही देण्यात आलेला नाही. आर्थिक बळावर कुणीही कुणालाही स्वतःचा गुलाम करू शकत नाही, तसेच स्वतःचे विचार किंवा खाद्यसंस्कृती कुणीही कुणावरही लादू शकत नाही. ती तशी लादणे, हे सुसंस्कृतपणाचे लक्षण नाही. मुसलमान समाजाला जी गोष्ट पवित्र वाटते, ती अन्य समाजाला पवित्र वाटेलच, असे नाही. त्यामुळे त्या समाजाने त्यांना पवित्र वाटणाऱ्या गोष्टी अन्य समाजाच्या माथी मारणे हे योग्य ठरत नाही, असे ज्येष्ठ साहित्यिक दुर्गेश परुळकर म्हणाले.

भारतात हलाल प्रमाणपत्र देणारी ‘जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’ ही मुख्य संघटना आहे. तिने ११ जुलै २००६ चा मुंबई रेल्वे बाँबस्फोट, वर्ष २००६ चा मालेगाव बाँबस्फोट, जर्मन बेकरी, पुणे येथील बाँबस्फोट, २६ नोव्हेंबर २००८ चे मुंबईवरील आतंकवादी आक्रमण, मुंबईच्या झवेरी बाजारातील साखळी बाँबस्फोट, कर्णावती बाँबस्फोट अशा अनेक आतंकवादी प्रकरणातील आरोपींना निरपराध ठरवण्यासाठी साहाय्य केले आहे. हलाल अर्थव्यवस्थेतून मिळालेल्या पैशांचा उपयोग ऑस्ट्रेलियात शरीयत कायदा लागू करणे आणि कट्टरतावादी संघटनांना साहाय्य करणे यांसाठी केला जातो’, असा संशय ऑस्ट्रेलियातील नॅशनल्स पक्षाचे खासदार जॉर्ज क्रिस्टेन्सेन यांनी केला आहे. प्राध्यापक डॉ. ताज हार्गी, ब्रिटीश इमाम (मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा प्रमुख) आणि प्राध्यापक हलाल प्रमाणपत्राविषयी म्हणतात, ‘हलाल प्रमाणपत्राच्या षडयंत्राची उगमस्थाने सौदीचे वहाबी कट्टरवादी, इजिप्तच्या इस्लामिक ब्रदरहूडची सलाफी विचारसरणी, तसेच भारत आणि पाकिस्तान येथील सुन्नी कट्टरपंथीय ही आहेत. ब्रिटनमध्ये इस्लामी कट्टरतावादाचे मागच्या दाराने प्रवेश करण्याचे हे षड्यंत्र आहे’, असेही परुळकर म्हणाले.

(हेही वाचा ‘हलाल’च्या विरोधात हिंदूंचा जनक्षोभ उसळणार – डाॅ. उदय धुरी)

‘हलाल’चा पैसा देशविघातक कृत्यांसाठी – डॉ. विजय जंगम

व्यवसायाने मी डॉक्टर आहे आणि माझी स्वतःची आयुर्वेदिक औषधांची कंपनी आहे. ७-८ वर्षांपूर्वी मी कामाच्यानिमित्ताने पंजाब, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड या राज्यांमध्ये फिरताना तेथील औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना विचारले, तेव्हा मला कळले की त्यांच्याकडे हलालचे प्रमाणपत्र आहे. तेव्हा त्यांनी मला सांगितले होते की, तुमच्या औषधांवर हलालचा शिक्का मारला, तर त्याची जास्त विक्री होईल. तेव्हा मला काही कळले नव्हते, पण जेव्हा आज आपण अमेझॉनवर पाहत आहोत, हजारो उत्पादने हलाल प्रमाणित आहेत. त्यांची यादीच पाहायला मिळत आहे. मांस विषयापुरता सीमित असलेला हा विषय आता कपडे, सौंदर्यप्रसाधने, औषधे या क्षेत्रातही गेला आहे. त्यामुळे हा नेमका काय प्रकार सुरु आहे, हे पाहावे लागेल. यावर कुणाचेही नियंत्रण राहिले नाही. त्याकडे सरकारे दुर्लक्ष करत आहेत. हे हलाल प्रमाणपत्र खासगी संस्था देत आहेत. यामाध्यमातून जमा होणारा पैसा देशविघातक कृत्यांसाठी वापरला जातो, असा संशय आहे. त्यामुळे कुणीही हलाल प्रमाणित वस्तू घेऊ नये. अशा उत्पादनांवर बहिष्कार टाकावा, असेही अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. विजय जंगम म्हणाले.

(हेही वाचा मुंबईत होणार्‍या हलाल परिषदेविरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटना एकवटल्या)

…तर हिंदूंचे आणि देशाचे अस्तित्व धोक्यात! – विवेक घोलप

हिंदू आणि शीख यांच्यासाठी हलाल मांस निषिद्ध आहे. मात्र तरीही हिंदूंना नाईलाजास्तव मुसलमानांकडून हलाल मांस घ्यावे लागत आहे. कारण हिंदूंना झटका मांस मिळेल अशी व्यवस्थाच नाही. तसेच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हिंदूंसाठी हलाल मांस निषिद्ध आहे, हेच हिंदूंना माहित नाही. त्यामुळे हिंदूंमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. हलालमध्ये मुसलमान आधी पशुवध केल्यावर त्याचे मांस अल्लाला देतो, ते मांस तो हिंदूंना देतो, याचा अर्थ हिंदू उष्टे मांस घेतात, हे चुकीचे आहे. त्यामुळे हिंदूंनी झटका पद्धतीचे मांस खरेदी करण्याची मागणी केली पाहिजे. आता हलाल सक्तीविरोधी परिषदेच्या माध्यमातून जनजागृती होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. विशेष म्हणजे हलालचे प्रमाणपत्र केवळ मांसा पुरते समिती न राहता आता ते फॅशन, कपडे, गृहोपयोगी वस्तू यांनाही हे प्रमाणपत्र दिले जात आहे. हलाल प्रमाणपत्र देणाऱ्या मुसलमान संस्था हा पैसा दहशतवादी संघटनांना पुरवत आहेत, हे अत्यंत भयानक आहे. हे जर आता थांबले नाही तर देशाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल, असे अखिल भारतीय खाटीक समाज संघटनेचे महाराष्ट्र प्रभारी विवेक घोलप म्हणाले.

(हेही वाचा काय आहे हलाल जिहाद? जाणून घ्या…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.