धनुष्यबाण गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देत देवेंद्र फडणवीस म्हणाले…

147

शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठविण्याच अंतरिम निर्णय निवडणूक आयोगाने शनिवारी घेतला. त्यामुळे दोन्ही गटांना आता शिवसेना हे नाव वापरता येणार नाही. आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. यानंतर संपर्ण राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनुष्यबाण गोठविल्याच्या निर्णयावर बोलताना मला आश्यर्यकारक काहीच वाटत नाही असी बोलकी प्रतियक्रिया दिली आहे.

(हेही वाचा – ठरलं! पक्षाच्या चिन्हासह नावासाठी निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’ ३ पर्याय)

गेल्या 20 ते 25 वर्षांमध्ये निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्ह गोठवून नंतर त्यावर अंतिम निर्णय देताना त्या-त्या वेळेच्या दोन्ही गटांची चिन्ह गोठवणं आणि नाव गोठवण्याचा निर्णय घेतला. या सगळ्या प्रक्रियेनंतर अंतिम निर्णय देणे अशीच आयोगाची प्रक्रिया असल्याचा इतिहास आहे. कार्यपद्धतीनुसार केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय प्रक्रियेनुसारच घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

उद्धव ठाकरेंनी दुपारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना नरेंद्र मोदी घासले गेलेले नाणं आहेत. असा उल्लेख केल्याच्या चर्चा होत आहेत. यावरून भाजप कडून आक्षेप नोंदवणं सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टीका करत प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी ते म्हणाले, बहुतेक उद्धव ठाकरे हे विसरले की नोटाबंदीनंतरच्या सगळ्या निवडणुका ते मोदींच्या नाण्यावरच जिंकले आहेत. त्यांचे 18 खासदार आणि 56 आमदार मोदींजींचे नाणं दाखवूनच निवडून आले आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच श्रद्धेय राहतील, पण देशात मोदींचे नाणे चालत राहील आणि मोदींचे नाणे हे खणखणीत आहे, असे फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.