शिंदे गट आणि उद्धन ठाकरे गटात शिवसेना कोणाची यावरून वाद सुरू असताना निवडणूक आयोगाकडूनन शनिवारी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्यात आले. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. एकीकडे अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्याचे पाहायला मिळाले तर दूसरीकडे धनुष्यबाणावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका, अले आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. तर पक्षातील प्रवक्त्यांना सुद्धा यासंदर्भातील सूचना देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – ठरलं! पक्षाच्या चिन्हासह नावासाठी निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’ ३ पर्याय)
निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर सर्वच पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. मात्र मनसे प्रमुख राज ठाकरेंनी यांनी यावर काहीही न बोलण्याची भूमिका घेतली आहे. इतकेच नाही तर मनसेच्या कोणत्याही प्रवक्त्याने, पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्याने यावर प्रतिक्रिया देऊ नये, अशा सूचना राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मनसेचे आमदार राजू पाटील, प्रकाश महाजन, संदीप देशपांडे आणि गजानन काळे यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर प्रतिक्रिया दिल्या होत्या. तर यावेळी संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही, म्हणणाऱ्यांचे नावंही संपलं अशी खोचक टीकाही मनसेच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. मात्र आता खुद्द राज ठाकरेंनी याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचे आवाहन केले आहे.
Join Our WhatsApp Community