नेत्ररोगतज्ज्ञ काय सांगतात, दर आठवड्याला किती तासांचा हवा स्क्रीनटाईम?

134

कोरोना काळात वर्क फ्रोम होमच्या संकल्पनेमुळे संगणक, मोबाईल आदींचा कामानिमित्ताने वापर वाढला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्ल्यानुसार दर आठवड्याला केवळ ७२ तास संगणक किंवा मोबाईलच्या वापरासाठी योग्य आहे. कामाचे वाढते ताण आणि मोबाईलचे व्यसन यामुळे डोळ्यांच्या तक्रारी सतत वाढतच असल्याचे नेत्ररोगतज्ज्ञांनी सांगितले आहे तर, वाढत्या डोळ्यांच्या त्रासावर घरगुती उपाय सतत सुरु ठेवणे योग्य नसल्याचेही नेत्ररोगतज्ज्ञ सांगतात.

(हेही वाचा – आता बस्स! उद्धव ठाकरे संतापले अन् म्हणाले, “४० डोक्याच्या रावणाने रामाचे धनुष्यबाण…”)

डोळ्यांचा वाढता ताण डोळ्यांच्या आजारांना कारणीभूत

संगणक किंवा मोबाईलच्या माध्यमातून काम देणे हे आता केवळ आयटी क्षेत्रापुरते मर्यादित राहिलेले नाही. प्रत्येक क्षेत्रात आता स्क्रिन मोबाईलवर काम वाढवण्याचे नियम लादल्याने मोबाईलचा स्क्रिन टाईम वाढला आहे. डोळ्यांचा वाढता ताण हे वेगवेगळ्या डोळ्यांच्या आजारांना कारणीभूत ठरतोय. या सर्वांत डोळ्यांतून पाणी येणे, डोळे लाल होण्याचे प्रकार वाढतच असल्याचे नेत्ररोगतज्ज्ञ सांगतात. बाजारात रास्त किंमतीत डोळ्यांच्या जळजळण्यावर वेगवेगळ्या कंपन्यांचे ड्रॉप्स सहज मिळतात. नेत्ररोगतज्ज्ञांच्या सल्ल्याशिवायही ड्रॉप्स डोळ्यांसाठी वापरणा-यांचे प्रमाण मोठे आहे, या लोकांना डोळ्यांच्या विविध आजारांनाही सामोरे जावे लागते, असे नेत्ररोगतज्ज्ञ सांगतात.

डोळ्यांवरचा ताण हटवणे गरजेचे

कित्येकदा डोळे सूजण्यावर दीर्घकालीन उपचारही घ्यावे लागतात. या सर्व समस्यांवर संगणक आणि मोबाईलचा मर्यादित वापर महत्त्वाचा ठरतो. दोन्ही साधनांचा वापर सतत करायचे टाळता येत नसल्यास अधूनमधून ब्रेक घेण्याचा सल्ला जेजे रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागाच्या नेत्ररोगतज्ज्ञ डॉ रागिणी पारेख देतात. दर तासाला किमान दहा मिनिटांचा ब्रेक घेत, डोळ्यांवरचा ताण हटवणे गरजेचे असल्याचे त्या सांगतात. दहा मिनिटांसाठी किमान चालण्याचा व्यायाम करा. निदान दहा मिनिटे कटाक्षाने मोबाईलवर पाहणे टाळल्यास डोळ्यांवर येणारा ताण टाळता येतो, असे डॉ पारेख सांगतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.