मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या चांगलंच अंगाशी आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात सातारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांवर दबाव आणण्याकरता गुन्हे दाखल केले जात असल्याचा दावा केल्यानंतर खैरे यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा – आता बस्स! उद्धव ठाकरे संतापले अन् म्हणाले, “४० डोक्याच्या रावणाने रामाचे धनुष्यबाण…”)
निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवले. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटाला शिवसेना या नावाचाही वापर करता येणार नाही. दोन्ही गटांना नवीन चिन्हासाठी सोमवारी दुपारी १ वाजेपर्यंत त्यांचे पर्याय निवडणूक आयोगाकडे दाखल करायचे आहेत. यानंतर ठाकरे आणि शिंदे गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.
काय म्हणाले चंद्रकांत खैरे
खैरे यांनी वेळोवेळी शिंदे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दात टीका केली होती. दरम्यान, एकनाथ शिंदे यांचे डावपेच बऱ्याच दिवसांपासून चालले होते. एकनाथ शिंदे साधा रिक्षावाला माणूस. त्याच्याकडे ऐवढा पैसा कुठून आला. शिवसेनेने अनेकांना मोठे केले, ग्रामपंचायत सदस्य ते खासदार बनवले आणि आता या लोकांनी शिवसेना सोडली. शिवसेना फोडण्याचे पाप या गद्दारांनी केले आहे. जर दिघे आता असतेल तर त्यांनी शिंदेंना उलटं टांगले असते, असा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. दिघे साहेबांच्या नावावर हे सगळं सुरू असले तरी ते वरून पाहत असतील की, बाळासाहेबांची शिवसेना यांनी फोडली असे त्यांना वाटत असेल.
खैरे यांनी केलेल्या या विधानानंतर शिंदे गटाचे राजेंद्र जंजाळ यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर खैरेंवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community