दौंड-मनमाड रेल्वे दुहेरी मार्गाच्या कामामुळे ‘या’ 10 गाड्या 11 दिवस रद्द

170

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागांतर्गत असलेल्या दौंड-मनमाड रेल्वे मार्ग दरम्यान दुहेरी मार्गाचे काम रेल्वेच्या निर्माण विभागाने हाती घेतल्याने ८ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर या कालवधीत दौंड- मनमाड दरम्यान धावणाऱ्या व नगर रेल्वे स्थानकातून पुढे जाणाऱ्या व येणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.तर काही रेल्वेचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

(हेही वाचा – धनुष्यबाण गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देत देवेंद्र फडणवीस म्हणाले…)

या रेल्वे गाड्या असणार रद्द

कोल्हापूर-गोंदिया एक्सप्रेस (११०३९), दादर-साईनगर शिर्डी एक्सप्रेस (११०४२), पुणे-भुसावळ विशेष एक्सप्रेस (०११३५), पुणे-जबलपूर विशेष एक्सप्रेस (०२१३१), पुणे- वीरांगना लक्ष्मीबाई विशेष एक्सप्रेस (०१९२१), पुणे-राणी कामलापती एक्सप्रेस (२२१७१), पुणे-नागपूर एक्सप्रेस (१२१३५),पुणे- बिलासपूर एक्सप्रेस (१२८५०),पुणे- नांदेड एक्सप्रेस (१७६२९), पुणे- काजीपेठ एक्सप्रेस (२२१५१) या रेल्वे गाड्या रद्द होणार आहेत. यात पुणे- नागपूर एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.

मार्गात बदल झालेल्या रेल्वे गाड्या यशवंतपूर -अहमदाबाद एक्सप्रेस ही गाडी दौंड -पुणे -लोणावळा- वसई रोड -सुरत मार्गे धावणार आहे. चेन्नई – साई नगर शिर्डी एक्सप्रेस ही रायचूर – विकाराबाद-बिदर –लातूर रोड –परभणी –अंकाई –मनमाड-बैराकपूर मार्गे धावेल तर मैसूर- साई नगर शिर्डी एक्सप्रेस ही गाडी कुर्डूवाडी -लातूर रोड -परभणी-अंकाई -मनमाड-बैराकपूर मार्गे धावणार आहे. पुणे –लखनऊ एक्सप्रेस ही गाडी लोणावळा –पनवेल –इगतपुरी –मनमाड मार्गे आणि पुणे –हावडा एक्सप्रेस ही गाडी लोणावळा –पनवेल- इगतपुरी–मनमाड मार्गे धावणार आहे. कोल्हापूर -हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ही गाडी लोणावळा –पनवेल –इगतपुरी –मनमाड मार्गे धावेल, पुणे – बनारस एक्सप्रेस ही लोणावळा –पनवेल –इगतपुरी –मनमाड मार्गे धावेल, पुणे – गोरखपूर एक्सप्रेस ही व्हाया लोणावळा –पनवेल –इगतपुरी –मनमाड मार्गे धावेल, गोरखपूर- पुणे एक्सप्रेस ही व्हाया मनमाड- इगतपुरी–पनवेल – लोणावळा मार्गे धावणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.