ऐन सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. दिवाळीआधी डाळींच्या किंमती वाढल्या आहेत. तूर डाळीचा भाव गेल्या आठवड्याभरात चार ते पाच रुपयांनी वाढला आहे. त्यासोबतच उडीद डाळीच्या किंमतीततही वाढ झाली आहे. उत्पादन घटण्याच्या भीतीने डाळींची दरवाढ सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या आठ दिवसांमध्ये तूर डाळीच्या किंमतीत चार ते पाच रुपयांची वाढ झाली. सध्या तूर डाळीचा ठोक बाजारातील दर हा 110 रुपये प्रति किलो झाला आहे. तर किरकोळ बाजारात तूर डाळीची किंमत 125 ते 130 रुपये किलो इतकी झाली आहे. उडीद डाळ 97 ते 100 रुपये किलो इतक्या दराने मिळत होती. मात्र ऐन दिवाळी आधी उडीद डाळीचा दर 105 ते 110 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. वाढलेल्या दरांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होण्याची शक्यता आहे.
( हेही वाचा: इराणमध्ये बुरखाविरोधी आंदोलन पेटले, आणखी एका महिलेचा मृत्यू, भारतीय मुस्लिम महिलांवर दबाव )
खाद्यतेलातही वाढ होण्याची शक्यता
यंदा अतिवृष्टीमुळे डाळीच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. डाळीच्या पिकांचे पावसात अतोनात नुकसान झाले. येत्या काळात डाळींची पिके घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे डाळींचे दर वाढण्यास आतापासूनच सुरुवात झाली आहे. एकीकडे रुपयांचे मूल्यही घसरते आहे. तसेच, खाद्यतेलाच्या किंमतीही वाढण्याची भीती आहे. खाद्यतेल 3 ते 4 रुपयांनी महागले आहे. यात आणखी वाढही होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.
Join Our WhatsApp Community