रशियाकडून युक्रेनच्या वसाहतींवर हल्ला, 17 ठार; युक्रेनमध्ये एअर अलर्ट जारी

185

युक्रेनमध्ये एअर अलर्ट जारी करण्यात आला आहे. रशियाने रविवारी युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला केला. या दुर्घटनेत अनेक जणांचा मृत्यू झाला तर काहीजण जखमी झाले. आता रशियाकडून पुन्हा हल्ल्याची शक्यता असल्याने, युक्रेनने एअर अलर्ट जारी केला आहे.

रशियाने जेपोरिजियावर क्षेपणास्त्राने हल्ला केला. या क्षेपणास्त्र हल्ल्यात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सुरक्षा परिषदेसोबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेन सतर्क झाले आहे.

( हेही वाचा: हलाल विरोधातील नेतृत्व राज ठाकरेंकडे द्या, मग बघा मनसेचे खळ्ळखट्याक – यशवंत किल्लेदार )

क्षेपणास्त्र हल्ल्यात 17 ठार

युक्रेन आणि रशियामधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. मागच्या 7 महिन्यांपासून हे युद्ध सुरु आहे. रशियाने जेपोरिजियावर क्षेपणास्त्राने हल्ला केला. या क्षेपणास्त्र हल्ल्यात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 40 युक्रेनियन नागरिक जखमी झाले आहेत. रशियाने जेपोरिजिया भागांत अनेक हल्ले केल्याचे सांगितले जात आहे. मागच्या तीन दिवसांत या भागात 34 जणांचा मृत्यू झाला आहे.

युक्रेनच्या लायमन शहरावर रशियाने ताबा मिळवला होता. आता लायमन शहरावर पुन्हा एकदा युक्रेनियन सैन्याने ताबा मिळवला आहे. लायमन हे डोनेट्स्क प्रांतातील महत्त्वाचे शहर आहे. हे शहर युक्रेनने परत मिळवल्याने पुतीन यांना हा मोठा झटका असल्याचे म्हटले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.