समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांचे निधन; 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

162

समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांचे वयाच्या 82 व्या वर्षी  निधन झाले आहे. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले. मुलायम सिंह यांना युरिन इन्फेक्शनचा त्रास होता. ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने त्यांना आयसीयू वाॅर्डमध्ये हलवण्यात आले होते.

( हेही वाचा: हलाल विरोधातील नेतृत्व राज ठाकरेंकडे द्या, मग बघा मनसेचे खळ्ळखट्याक – यशवंत किल्लेदार )

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील गुरुग्रामधील मेदांता रुग्णालयात मुलायम सिंह यादव यांच्यावर उपचार सुरु होते. मुलायम सिहं यांना युरिन इन्फेक्शनचा त्रास होता. मुलायम सिंह यादव यांची प्रकृती चिंताजनक असल्याने ते जीवनरक्षक औषधांवर होते.

मुलायम सिंह यांच्याविषयी थोडक्यात 

मुलायम सिंह यांचा जन्म नोव्हेंबर 1939 रोजी उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यातील सैफई गावार मूर्ती देवी आणि सुघर सिंह यांच्या शेतकरी कुटुंबात झाला. मुलायम सिंह हे धरतीपुत्र म्हणून प्रसिद्ध आहेत. 4 ऑक्टोबर 1992 रोजी त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ते तीनदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही होते.

1992 मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. 5 डिसेंबर 1989 ते 24 जानेारी 1991, 5 डिसेंबर 1993 ते 3 जून 1996 आणि 29 ऑगस्ट 2003 के 11 मे 2007 या कालवधीत ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते .याशिवाय ते केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्रीही राहिले आहेत. मुलायम सिंह हे उत्तर प्रदेशातील यादव समाजाचे सर्वात मोठे नेते म्हणून ओळखले जातात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.