काळजी घ्या! मुंबईकरांनो शहरात पसरलीये डोळ्याची साथ

181

मुंबईकरांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण मुंबईत आता डोळे येण्याची साथ आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मुंबईत फिरताना काळजी घ्या… डोळ्यातून पाणी आणि घाण येणे, डोळे लाल होणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे असून डोळे येण्याचा संसर्ग सामान्यपणे प्रथम एकाच डोळ्याला होतो. मात्र एक डोळा आल्यानंतर दुसऱ्या डोळ्यालाही संसर्ग होत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे हा संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

(हेही वाचा – नेत्ररोगतज्ज्ञ काय सांगतात, दर आठवड्याला किती तासांचा हवा स्क्रीनटाईम?)

गेल्या आठवड्यापासूनच मुंबईत डोळ्यांची साथ

वातावरणात बदल होत असल्याने आधीच व्हायरल आजारांनी मुंबईकर त्रस्त असताना आता डोळे येण्याच्या साथीने मुंबईकर त्रस्त आहेत. हा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्णांनी बाहेर जाणं टाळावे, असा सल्ला वैद्यकीय विभागाकडून दिला जात आहे. गेल्या आठवड्यापासूनच मुंबईत डोळ्यांची साथ पसरू लागली आहे. या प्रकारात डोळ्यांना सूज येते, अशी काहीशी लक्षणे मुंबईकरांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे यावर कोणतेही घरगुती उपचार करू नका, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आले.

कोणती काळजी घ्याल…

डोळे आल्याचा संसर्ग आल्यास काय काळजी घ्यावी. जर डोळ्याचा संसर्ग झाल्यास किंवा डोळे आल्यास डोळ्यांना हात लावू नये, डोळे सतत स्वच्छ पाण्याने धुवत रहा, डोळे येणे हा संसर्गजन्य रोग असल्याने शक्यतो प्रवास करणं टाळा, इतरांपासून दूर रहा, डोळ्यांना हात न लावता रूमालाचा वापर करा, तेलकट पदार्थांचे सेवन करू नका आणि कोणतेही घरगुती उपाय न करता डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.