भंडाऱ्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भंडाऱ्यात घडलेल्या एका दुर्घटनेत तरूणाचा जीव थोडक्यात वाचला आहे. पँटच्या खिशात ठेवलेल्या मोबाईल फोनने अचानक पेट घेतल्याने युवक जखमी झाला. त्याच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले. ही घटना भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील सौंदळ पुनवर्सन येथे घडली आहे.
(हेही वाचा – धनुष्यबाण गोठवल्यानंतर ठाकरेंवर अमृता फडणवीसांचा निशाणा, दिले ‘हे’ ४ खोचक पर्याय)
काय घडला प्रकार
भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील सौंदळ पुनवर्सन येथे ही धक्कादायक घटना घडली. या घटनेत २५ वर्षीय अंकित भुते हा तरूण किरकोळ जखमी झाला आहे. नेहमीप्रमाणे सकाळी घरातून निघताना अंकितने मोबाईल खिशात ठेवला होता. गावातील सांस्कृतिक कार्यक्रमात असताना अचनाक अंकितला काहीतरी जळण्याचा भास झाला. यावेळी त्याच्या खिशातच त्याच्या मोबाईलने पेट घेतल्याचे समोर आले. हा पेटता फोन त्याने बाहेर फेकून दिला. मात्र या घटनेत अंकितच्या मांडीला मोठी जखम झाली. यानंतर उपस्थित ग्रामस्थांनी तात्काळ अंकितला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत अंकितच्या पायाचा काही भाग जळाला. यानंतर त्याच्यावर उपचार करून त्याला त्याच्या घरी पाठवण्यात आले. याबद्दल माहिती देताना तो म्हणाला की, मी मोबाईल घेऊन जवळपास १४-१५ महिने झाले आहेत. आतापर्यंत काही समस्या जाणवली नाही. माझ्याकडे असलेला हा फोन विवो कंपनीचा आहे. आणि त्याची चार्जिंगही जास्त केली नव्हती असे त्याने सांगितले
Join Our WhatsApp Community