राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वीय सचिवांना शिवीगाळ केली अशा चर्चा सध्या सुरू आहे. मात्र यानंतर आता अब्दुल सत्तार यांनी या चर्चांना पूर्णविराम देत या वादावर स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी सत्तार म्हणाले, वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठतीत मी कोणत्याही स्वरूपाची शिवीगाळ केली नसल्याचे सांगितले.
काय घडला प्रकार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अधिकृत शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर रविवारी, शिंदे गटाची बैठक झाली. या बैठकीत राज्य सरकारची कामगिरी आणि निवडणूक आयोगाच्या निकालाबाबत चर्चा करण्यात आली होती. या बैठकीत अब्दुल सत्तार यांनी शिंदेंच्या स्वीय सचिवाला शिवीगाळ केली असल्याचे चर्चा होती. सत्तार यांनी म्हटले की, कालच्या बैठकीत मी कोणत्याही स्वरूपाची शिवीगाळ केली नाही. मला राजकारणात ४० वर्ष झाली आहेत. मी असे का वागेल असा प्रश्न उपस्थित करत ही बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे.
(हेही वाचा – शिंदे गटाकडून पक्षाच्या तीन नावांचा पर्याय, निवडणूक आयोग काय घेणार निर्णय?)
वर्षावर झालेल्या या बैठकीत मतदार संघातील कामांबाबत चर्चा करत होतो. काही कामांना स्थगिती देण्यात आल्याची चर्चा होती. त्यामुळे या पूर्वीच्या कामांना स्थगिती द्या, मात्र आताच्या कामाला स्थगिती देऊ नका, असे मत व्यक्त केले असल्याचे सत्तार यांनी सांगितले. वर्षातील बैठकीतून फक्त मीच नव्हे तर इतरही काही मंत्री निघून गेल्याचे सत्तार यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community