शिवसेनेने तेव्हाही उगवता सूर्य चिन्हावर लढवलेली निवडणूक, पण…

234
अंधेरी (पूर्व) विधानसभा निवडणुकीत केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेची धनुष्यबाण निशाणी गोठवली आहे. तसेच शिवसेना हे नावदेखील वापरण्यास प्रतिबंध केला आहे. त्यासाठी आयोगाने शिवसेनेनेला पर्यायी चिन्हे कोणते हवे त्याची मागणी केली, त्यानुसाठ शिवसेनेने तीनच पर्याय दिले आहे, ज्यात उगवता सूर्य हे चिन्ह आहे. याच चिन्हावर शिवसेनेने पहिली विधानसभेची निवडणूक लढली होती आणि जिंकलीही होती, पण फरक इतकाच आहे, त्यावेळी शिवसेनेकडे कट्टर शिवसैनिक होते, आज सुषमा अंधारे यांच्यासारखे ‘कट्टर’ शिवसैनिक आहेत.

शिवसेनेची आजची परिस्थिती काय आहे?  

शिवसेना पहिल्यांदा निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय झाली, ती १९७० सालची विधानसभा निवडणूक होती. कृष्णा देसाई यांची हत्या झाली, तेव्हा परळ येथे पोट निवडणूक झाली होती. त्यावेळी शिवसेनेला उगवता सूर्य ही निशाणी देण्यात आली होती. त्यात शिवसेनेनेचे उमेदवार वामनराव महाडिक हे उमेदवार होते. त्यावेळी शिवसेनेचा खरोखरीच सूर्य उगवला होता. कारण सर्व पक्ष शिवसेनेच्या विरोधात होते, केवळ आताचा भाजप आणि तेव्हाच जनसंघ शिवसेनेच्या पाठीशी होता, त्या जोरावर शिवसेनेने परळची पोट निवडणूक जिंकली होती. त्यामुळे शिवसेनेसाठी उगवता सूर्य ही निशाणी शुभचिन्ह आहे, या चिन्हासाठी उद्धव ठाकरे यांनी आग्रह धरावा, पण १९७० साली पोट निवडणुकीत शिवसेनेकडे दत्ताजी साळवी, मनोहर जोशी, छगन भुजबळ, सुधीर जोशी असे कट्टर शिवसैनिक होते, पण आज वेगळे वातावरण आहे. आज शिवसेनेकडे सुषमा अंधारे यांच्या सारख्या पुरोगामी विचारांची माणसे आहेत, जे पक्षाला ध्येय धोरणे सांगत आहेत, अशा शिवसैनिकांच्या जोरावर शिवसैनिक कशी निवडणूक लढवणार, हे पाहणे गरजेचे आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.