रशियाच्या ताब्यात असलेल्या क्रीमियामधील एका पुलावर स्फोट झाला. या स्फोटानंतर रशियाने अधिक आक्रमक भूमिका घेतली असून युक्रेनवर मोठा हल्ला केला आहे. रशियाने या स्फोटासाठी युक्रेनला जबाबदार ठरवत त्यांच्यावरील हल्ले अधिक तीव्र केले आहेत. रशियाने आता युक्रेनवर ७५ क्षेपणास्त्र डागत हल्ला केला आहे. यामध्ये साधारम ११ जणांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक लोक जखमी झाले असल्याचे सांगितले जात आहे. युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनवर रशियाने केलेला आतापर्यंतचा हा मोठा हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सोमवारी १० ऑक्टोबर रोजी रशियाने युक्रेनवर हा मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला आहे.
(हेही वाचा – शिंदे-ठाकरे गटाची नावं तर ठरली, शिंदे गटाला कोणतं चिन्ह मिळणार?)
मिळालेल्या माहितीनुसार, क्रिमियामधील स्फोट आणि लायमन शहरावर युक्रेनने पुन्हा मिळवलेला ताबा यामुळे रशिया अधिक आक्रमक झाला आहे. क्रिमियामधील पुलावर झालेल्या स्फोटासंबंधित रशियाने केलेले आरोप फेटाळले आहेत. यानंतर रशियाने युक्रेनवरील हल्ले तीव्र केले आहेत. या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनची राजधानी कीव्हसह अनेक शहरांचे मोठे नुकसान झाले आहे.
रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयालाही लक्ष्य करण्यात आले आहे. या हल्ल्याचे मुख्य उद्दीष्ट युक्रेनमधील मुख्य ऊर्जा स्त्रोत आणि सुविधांचे नुकसान करणं आहे. यामुळे युक्रेनची राजधामी कीव्हसह दक्षिणेकडील अनेक शहरांदेखील लक्ष्य करत क्षेपणास्त्र डागण्यात आली आहेत.
Join Our WhatsApp Community