निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटांत चांगलेच आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. यानंतर दोन्ही गटांना धनुष्यबाण चिन्हासह नावाचाही वापर करता येणार नाही, असे निर्देश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले होते. या सर्व संघर्षानंतर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले. तर शिंदे गटाला चिन्हासाठी पर्याय सुचवण्याचे आदेशही दिले आहे. दरम्यान, ठाकरे गटाल मिळालेल्या मशाल चिन्हावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाण चिन्हाबाबत मोठा दावा केला आहे.
(हेही वाचा – शिंदे-ठाकरे गटाची नावं तर ठरली, शिंदे गटाला कोणतं चिन्ह मिळणार?)
काय म्हणाले शिंदे
विधानसभेतील आमदारांचा पाठिंबा आणि शिवसेनेच्या ७० टक्के जास्त पदाधिकाऱ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. बहुमत आमच्याकडे असल्याने धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळायला पाहिजे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका आम्ही घेतली, बाळासाहेबांची शिवसेना म्हणून आमच्या पक्षाला मान्यता मिळाली आहे. मशाली अन्यायाविरोधाथ पेटवल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी देखील मशाली पेटवल्या होत्या. हे अन्यायाविरोधात मशाली पेटवणार का…असे म्हणत शिंदेंनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. बहुमत ज्यांच्याकडे असते त्यांना चिन्ह मिळते. हा आमच्यावर झालेला अन्याय आहे. मेरीटवर चिन्ह आम्हालात मिळाले पाहिजे. इतकेच नाही तर सोशल मीडियावर आमची बदनामी केली जात असल्याचा दावाही शिंदेंनी केला आहे. अंधेरीची पोटनिवडणूक आम्ही युती म्हणून लढवणार आहोत आणि आम्हीच जिंकणार. धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला मिळाले नाही याचे दुःख आहे. पण बहुमत आमच्याकडे आहे. आम्हाला उलट्या काळजाचे म्हणाले, उलट्या काळजाचे विश्वास घातकी कोण आहे हे सर्वांना माहित आहे. उलट्या काळजाच्या माणसाने २०१४ साली ज्याला दया माया नाही निती धर्म नाही सर्वच त्याग केला त्यांनी प्रथम आपले आत्मपरिक्षण करावे असा सल्लाही शिंदेंनी ठाकरेंना दिला आहे.
Join Our WhatsApp Community