प्रवाशांना मुंबई ते उरण हे अंतर केवळ ३० मिनिटांमध्ये पार करता येणार आहे. यासाठी मोरा जेट्टीच्या बांधकामाला येत्या १५ दिवसांत सुरूवात होणार आहे.
( हेही वाचा : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची दाऊद टोळी विरुद्ध मोहीम, खंडणी प्रकरणात ५ जणांना अटक )
१५ दिवसांमध्ये कामाला सुरूवात होणार
सागरमाला योजनेअंतर्गत नवीन जेट्टी बांधणे तसेच रो रो सेवा सुरू करण्यावर भर देण्यात येत आहे. या सागरमाला योजनेतील भाऊचा धक्का ते मोरा, उरण रो रो सेवा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यासाठी अंदाजे ८८ कोटी ७२ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. पावसाळ्यामुळे हा कामाला सुरूवात होण्यास विलंब झाला. पावसाळ्यात काम करता येत नसल्याने ऑक्टोबरमध्ये कामास सुरूवात करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार आता १५ दिवसांमध्ये कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती देण्यात आली.
भाऊचा धक्का ते उरण ३० मिनिटांमध्ये
काम सुरू झाल्यावर दोन वर्षांत काम पूर्ण करण्यात येणार आहे. नवीन मोरा जेट्टी सुरू झाल्यानंतर रो रो सेवा सुरू होणार असून भाऊचा धक्का ते उरण हे अंतर ३० मिनिटांमध्ये पार करता येणार आहे.
Join Our WhatsApp Community