मुंबईतील आणिक वडाळा रोडवरील सोमय्या नाला आणि प्रतीक्षा नगर नाला येथील पुलांची रुंदी वाढवण्यात येणार असून या पुलांच्या रुंदीकरणाचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. या दोन्ही पुलांच्या रुंदीकरणासाठी सुमारे ३३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. यासाठीच्या पुलांच्या बांधकामांकरता कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. लवकरच या कामांना सुरुवात केली जाणार असल्याचे पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या दोन्ही अरुंद पुलांचा आकार आता वाढला जाणार आहे.
महापालिकेच्या आणिक वडाळा रोडवरील सोमय्या नाला आणि प्रतीक्षा नगर नाला येथील पुलांची रुंदीकरण आणि पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला. आणिक वडाळा रोडवरील सोमय्या नाल्याची लांबी १२.४ मीटर व रुंदी ३ मीटर एवढी असून याची लांबी व रुंदी वाढवण्यात येणार आहे. या नाल्यावरील पुलाची लांबी आता २९.४ मीटर आणि रुंदी १५.०५ मीटर एवढी केली जाणार आहे.
तर प्रतीक्षा नगर येथील नाल्यावरील पुलाची लांबी सध्या २५.६ मीटर एवढी असून ती आता २९.४ मीटर एवढी केली जाणार आहे. तर या पुलाची लांबी ३ मीटर ऐवजी १०.०५ मीटर एवढी केली जाणार आहे. या नाल्यावरील पुलाच्या रुंदीकरणाच्या कामासाठी मागवलेल्या सात कंपन्यांनी भाग घेतला होता.त्यामध्ये एम.ई. इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली असून या दोन्ही पुलांसाठी ३२ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.
सोमय्या नाल्यावरील पूल
- पुलाची लांबी : २९. ४ मीटर
- पुलाची रुंदी : १५.५ मीटर
- स्पॅनची संख्या : १
- स्पॅनची लांबी : १५.५मीटर
- बांधकाम : पायाचे बांधकाम अणि स्ट्रक्चरल स्टील
प्रतीक्षा नगर नाल्यावरील पूल
- पुलाची लांबी : २९. ४ मीटर
- पुलाची रुंदी : १०.५ मीटर
- स्पॅनची संख्या : १
- स्पॅनची लांबी : १०.५मीटर
- बांधकाम : पायाचे बांधकाम अणि स्ट्रक्चरल स्टील