अंधेरी (पू.) येथील विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला ‘मशाल’ चिन्ह दिले आहे. त्यावर उद्धव ठाकरे गट समाधानी आहे, यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आनंद व्यक्त केला आहे.
"ही मशाल अन्याय, गद्दारीला जाळणारी आहे…"
– शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे pic.twitter.com/4T4kABXBUs— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) October 11, 2022
ही मशाल अन्याय, गद्दारीला जाळणारी
शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवण्यात आले होते, त्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हासाठी तीन पर्याय देण्यास सांगण्यात आले होते. दोन्ही गटाकडून त्यादृष्टीने प्रत्येकी तीन पर्याय सुचविण्यात आले होते. आता निवडणूक आयोगाने आपला निकाल जाहीर केला आहे. यात ठाकरे गटाला ‘मशाल’ चिन्ह देण्यात आले. त्यावर उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून नव्या चिन्हाचा फोटो शेअर करत ‘ही मशाल अन्याय, गद्दारीला जाळणारी आहे…’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community