अलर्ट! पुण्यातील पाणीपुरवठा १३ ऑक्टोबरला राहणार बंद

140

पुण्यातील लष्कर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र, वडगाव रॉ वॉटर आणि राजीव गांधी पंपिंग केंद्रात येत्या गुरूवारी १३ ऑक्टोबरला विद्युत, पंपिंगविषयक तसेच स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या केंद्राअंतर्गत येत असलेल्या काही भागाचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार १४ ऑक्टोबरला सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.

( हेही वाचा : उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या शिवसेनेला हरवा, असं सांगणार का? )

या भागात येणार नाही पाणी

लष्कर जलकेंद्र : संपूर्ण हडपसर परिसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणे नगर, काळे पडळ, बी.टी-कवडे रोड, भीमनगर, कोरेगाव पार्क, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, वानवडी, जगताप चौक परिसर, जांभूळकर मळा, काळेपडळ, हंडेवाडी रोड, महंमदवाडी गाव, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदय नगर, लुल्लानगर, संपूर्ण पुणे कँन्टोनमेंट बोर्ड, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बुद्रुक, शेवाळवाडी, खराडी, वडगाव शेरी (काही भाग) संपूर्ण ताडीवाला रोड, मंगळवार पेठ, मालधक्का रोड, येरवडा गाव, एनआयबीएम रोड, रेसकोर्स.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.