ठाकरे गटाची निवडणूक चिन्हावरून कोंडी? ‘या’ पक्षाचा ‘मशाली’वरही दावा! निवडणूक आयोगाकडे धाव

141

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला निवडणूक आयोगाकडून मशाल हे चिन्ह देण्यात आले. यानंतर याच चिन्हावरून वाद निर्माण होण्याती शक्यता दिसत आहे. मशाल हे आणखी एका पक्षाचं चिन्ह आहे. त्यामुळे आता हा पक्ष निवडणूक आयोगाकडे धाव घेण्याच्या तयारीत आहेत. कारण दिवगंत नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीने मशाल या चिन्हावर दावा केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, समता पार्टीने निवडणूक अयोगाला ई-मेल पाठवून चिन्हावर दावा केल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा- लोकलने प्रवास करणा-या महिलांसाठी मोठी बातमी; लोकलमध्ये महिला डबे वाढवले)

शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर शिंदे गटाने शिवसेना पक्षावरच दावा केला होता. यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना हे मूळ नाव वापरण्यास मनाई करत त्यांचे चिन्ह देखील गोठवले यानंतर दोघांना नवे नाव आणि चिन्ह देण्यात आले. यावेळी शिवसेना गटाला आयोगाकडून मशाल चिन्ह देण्यात आले. तर २००४ मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाची प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता रद्द केल्यानंतर हे चिन्ह खुले केले होते. त्यामुळे समता पार्टीचे मशाल हे चिन्ह ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने दिले.

मशाल चिन्हावर समता पार्टीचा दावा

  • समता पार्टी हा बिहार राज्यातील पक्ष आहे.
  • १९९४ मध्ये जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडून समता पार्टीची स्थापना करण्यात आली होती.
  • १९९६ मध्ये निवडणूक आयोगाकडून समता पार्टीला मशाल हे चिन्ह देण्यात आले होते.
  • २००४ मध्ये समता पार्टीची मान्यता निवडणूक आयोगाकडून रद्द करण्यात आली होती.
  • २०१४ नंतर समता पार्टीने एकही निवडणूक लढवली नाही.
  • ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळाल्याने समता पार्टी सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाकडे मशाल चिन्ह मिळावे यासाठी ई-मेल केला असल्याचे सांगितले जात आहे. मशाल चिन्हात साम्य असल्याने मतविभागणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मशाल चिन्ह इतरांना न देण्याची विनंती करण्यात आल्याचे समता पार्टीने सांगितले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.