ठाण्यात झालेल्या महाप्रबोधिनी यात्रेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रक्षोभक भाषणं केल्याप्रकरणी ठाकरे गटातील काही नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला असून यामध्ये सुषमा अंधारेंचे देखील नाव आहे. दरम्यान, कलम 153 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत, तरीही राज्य शासनाने दाखल केलेला हा गुन्हा शुभशकुन असल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या विरोधात प्रक्षोभक भाषण करणं ठाकरे गटांतील ‘या’ नेत्यांना भोवलं, ७ जणांवर गुन्हा)
काय म्हणाल्यात सुषमा अंधारे
महाप्रबोधन यात्रेच्या उद्घाटन सभेतील वक्ते म्हणून मी, स्वतः, खा. राजन विचारे, खा. विनायक राऊत, आ. भास्कर जाधव आणि आमच्या अनिताताई बिर्जे अशा पाच जणांवर 153 नुसार गुन्हा दाखल झाल्याचे समजते. आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत तरीसुद्धा राज्य शासनाने दाखल केलेला हा गुन्हा शुभशकुन आहे, असे ट्वीट सुषमा अंधारे यांनी केले आहे.
महाप्रबोधन यात्रेच्या उद्घाटन सभेतील वक्ते म्हणून मी, स्वतः, खा. राजन विचारे, खा. विनायक राऊत, आ. भास्कर जाधव आणि आमच्या अनिताताई बिर्जे अशा पाच जणांवर 153 नुसार गुन्हा दाखल झाल्याचे समजते. आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत तरीसुद्धा राज्य शासनाने दाखल केलेला हा गुन्हा शुभशकुन आहे.
— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) October 11, 2022
ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये महाप्रबोधिनी यात्रेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या विरोधात प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपावरून शिंदे गटाचे दत्ताराम ऊर्फ बाळा सखाराम गवस यांनी ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव, खासदार व शिवसेना सचिव विनायक राऊत, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, ठाणे महिला आघाडी अध्यक्षा अनिता बिजे, माजी नगरसेवक मधुकर देशमुख, ठाणे शहरप्रमुख केदार दिघे, नगरसेवक नरेश मणेरा, सुभाष भोईर, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे आणि सूत्रसंचालक सचिन चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Join Our WhatsApp Community