भारतीय नौदलाचे MiG-29K लढाऊ विमान कोसळलं, गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर अपघात

141

गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर भारतीय नौदलाचे MiG-29K लढाऊ विमान कोसळल्याचे समोर आले आहे. हे विमान गोव्याच्या किनाऱ्यावर नियमित उड्डाण करून तळावर परतत असताना काही तांत्रिक बिघाडामुळे हे लढाऊ विमान समुद्रात कोसळले आणि हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात वैमानिक सुखरूप असून कोणतीही दुखापत झालेली नाही.

हा अपघात गोव्याजवळ झाला असून विमान उड्डाण करत असताना यामध्ये तांत्रिक बिघाड झाला. यानंतर फायटर जेट गोव्यातील समुद्राजवळ क्रॅश झाल्याची माहिती भारतीय नौदलाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या घटनाप्रकरणी बोर्ड ऑफ इन्क्वायरीने विमान अपघाताची कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत.

(हेही वाचा – ठाकरे गटाच्या बोगस प्रतिज्ञापत्र प्रकरणी मुंबई पोलीस गुन्हे शाखेकडून ‘या’ जिल्ह्यात तपास सुरू)

मिळालेल्या माहितीनुसार, विमान क्रॅश होण्यापूर्वीच वैमानिकाने स्वतःची सुटका केल्यामुळे मोठी दुर्घटना घटना टळली आहे. अपघातापूर्वी वैमानिकाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत विमानातून उडी मारत स्वतःचा जीव वाचवला. वैमानिकाची प्रकृती सध्या स्थिर आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हे विमान गोव्याजवळील समुद्रात कोसळले. यानंतर भारतीय नौदलाने बचावकार्य राबवत वैमानिकाला समुद्रातून सुखरूप बाहेर काढले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.