WhatsApp वापरण्यासाठी आता मोजावे लागणार पैसे

107

प्रत्येक स्मार्टफोनचा अविभाज्य घटक असलेल्या व्हाॅट्सअॅपमध्ये मोठे बदल होणार आहेत. Whatsappने प्रिमियर सब्सक्रिप्शन प्लॅन आणण्याची तयारी चालवली असून, प्रिमियर वापरकर्ते अधिक सदस्यांसोबत व्हिडीओ काॅल करु शकतील.

90 दिवसांत बदलता येईल वेबसाइट

  • Whatsapp वरुन व्यवसाय करणा-यांसाठी आपल्या वेबसाइटची लिंक अॅपला जोडण्याची सोय असेल. लिंकवर क्लिक करताच ग्राहक थेट वेबसाइटवर जातील.
  • सर्च ऑप्शनमध्ये वेबसाइटचे नाव लिहिताच वेबसाइट दिसायला लागेल.
  • 90 दिवसांत वेबसाइट बदलता येईल.
  • व्हिडिओ काॅलिंगचे नवे फिचर
  • तिसरे फिचर व्हिडिओ काॅलिंगमध्ये जोडण्यात आले आहे.
  • व्हाॅट्सअॅपवर सध्या एका व्हिडिओ काॅलवर 32 लोक जोडले जाऊ शकतात. यात आता आणखी जास्त लोक जोडले जाऊ शकतील.

( हेही वाचा: दिवाळीच्या नावावर ‘चलो अ‍ॅप’चे सबस्क्राईबर वाढवण्याची बेस्टची योजना; करा ९ रुपयांमध्ये ५ वेळा बस प्रवास )

अद्याप ठरली नाही किंमत

बिझनेस युजर्सच्या सब्सक्रिप्शन प्लॅनची किंमत अद्याप ठरलेली नाही. सामान्य वापरकर्त्यांचा व्हाॅट्सअॅप सब्सक्रिप्शन प्लॅनही काढून घेतलेला नाही. त्यामुळे नव्या प्लॅनच्या किमतीबाबत लोकांना उत्सुकता आहे.

टेलिग्रामच्या संस्थापकांनी केला होता हेरगिरीचा आरोप

मागील 13 वर्षांपासून हेरगिरीसाठी व्हाॅट्सअॅपचा वापर होत आहे, असा आरोप टेलिग्राम अॅपचे संस्थापक पाॅवेल ड्युरोव यांनी केला आहे. व्हाॅट्सअॅपमध्ये मुद्दाम सुरक्षा त्रुटी ठेवण्यात आल्या आहेत, असा त्यांचा दावा आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.