व्हिस्टाडोम कोचची प्रवाशांना भुरळ, ६ महिन्यांत ५६ हजार प्रवाशांनी केला प्रवास

एप्रिल ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत ७.३२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त

111

मध्य रेल्वेवरील व्हिस्टाडोम डब्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. मुंबई- गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या आणि धबधब्यांची चित्तथरारक दृश्ये असोत किंवा मुंबई – पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची नयनरम्य दृश्ये असोत, काचेचे टॉप आणि रुंद खिडक्या असलेले हे डबे हिट ठरले आहेत.

६ महिन्यांत ५६ हजार प्रवाशांनी केला प्रवास

मध्य रेल्वेने एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022 या सहा महिन्यांत 56,895 प्रवाशांची नोंदणी करून रु. 7.32 कोटी महसूल मिळवला आहे. मुंबई-मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस ही 100% पेक्षा जास्त occupancy म्हणजे 16,078 प्रवासीसंख्येसह सर्वात पुढे असून रु.3.35 कोटी महसूल मिळविला आहे. मुंबई -पुणे-मुंबई डेक्कन क्वीनने अप दिशेने पुणे ते मुंबई दरम्यान रु. 1.43 कोटींच्या महसूलासह 99% occupancy नोंदवली आहे. मुंबई- पुणे – मुंबई डेक्कन एक्स्प्रेस ने 100% occupancy सह म्हणजेच 16,190 प्रवासी संख्या आणि रु. 1.26 कोटी महसूल प्राप्त केला आहे.

(हेही वाचा – Indian Railway: आता चालत्या ट्रेनमध्ये मोटरमनला डुलकी लागली तरी नो टेन्शन! कारण)

वर्ष 2018 मध्ये मुंबई- मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये विस्टाडोम कोच पहिल्यांदा मध्य रेल्वेत सादर करण्यात आले. प्रवाशांच्या प्रचंड मागणीमुळे, मुंबई – मडगाव मार्गावरील दुसरा विस्टाडोम कोच 15.09.2022 पासून तेजस एक्सप्रेसला जोडण्यात आला. या डब्यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे हे डबे मुंबई – पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये 26.6.2021 पासून सुरू करण्यात आले आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मुंबई-पुणे मार्गावरील आणखी दोन विस्टाडोम डबे डेक्कन क्वीनला दि. 15.8.2021 पासून आणि प्रगती एक्स्प्रेसमध्ये दि. 25.07.2022 पासून जोडण्यात आले. तसेच पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये देखील एक विस्टाडोम कोच दि. 10.08.2022 पासून जोडण्यात आला आहे.

अनेक वैशिष्ट्यांसह आकर्षक व्ह्यूइंग गॅलरी

व्हिस्टाडोम डब्यांमध्ये काचेच्या छताशिवाय रुंद खिडक्या, एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट आणि पुशबॅक खुर्च्या, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट डोअर्स, दिव्यांगांसाठी रुंद बाजूचे सरकते दरवाजे, सिरेमिक टाइल फ्लोअरिंग असलेली टॉयलेट इत्यादी अनेक वैशिष्ट्यांसह आकर्षक व्ह्यूइंग गॅलरी आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.