क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! आता T20 विश्वचषकाचा आनंद घ्या चित्रपटगृहात

181

टी-२० विश्वचषकाला १६ ऑक्टोबरपासून सुरूवात होत आहे. पुढील आठवड्यामध्ये सुरू होणाऱ्या विश्वचषकाचा आनंद भारतीयांना सिनेमागृहात सुद्धा घेता येणार आहे. INOX Leisureने मंगळवारी यासंदर्भात निवेदन जारी केले आहे. यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC सोबत करार केला आहे. याअंतर्गत देशभरातील चित्रपटगृहांमध्ये क्रिकेट सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. २३ ऑक्टोबरपासून भारत विरूद्ध पाकिस्तान असा पहिला सामना रंगणार आहे. या पहिल्या सामन्याने या योजनेची सुरूवात होईल. यासोबतच उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्याचे सुद्धा थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचे सामने २५ हून अधिक शहरांमध्ये INOX मल्टिप्लेक्सवर थेट प्रक्षेपित केले जातील असे कंपनीने म्हटले आहे.

( हेही वाचा : उज्जैनच्या महाकालेश्वर कॉरिडॉरचे काय आहे वैशिष्ट्य? पहा सुंदर फोटो)

येत्या १६ ऑक्टोबरपासून T20 विश्वचषक स्पर्धेला सुरूवात होणार आहे. सुपर १२ टप्पा २२ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरूद्ध आहे. INOX २३ ऑक्टोबरला या सामन्यापासून भारतीय संघाच्या सर्व सामन्यांचे प्रसारण करणार आहे. क्रिकेट आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार असल्याने प्रेक्षकांमध्येही उत्साह आहे.

७०५ स्क्रिनवर क्रिकेट सामने

INOXचे देशभरात १६५ मल्टिप्लेक्स असून यात एकूण ७०५ स्क्रिन्स आहेत. INOXची आसनक्षमता जवळपास १ लाख ५७ हजार इतकी आहे. अलिकडेच INOX आणि PVR च्या विलिनीकरणाची घोषणा करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.